वाशी रिपोर्टर:तालुक्यातील तेरखेडा महसूल मंडळांमध्ये जिल्हा परिषद प्रशाला तेरखेडा येथे दिनांक 13 जानेवारी 2019 वार रविवार रोजी महाराजस्व अभियानाअंतर्गत समाधान शिबिर संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन मंडळाधिकारी माळी यांच्या हस्ते करण्यात आले. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.सुधीर पाटील, तहसील कार्यालय वाशी महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडळांमध्ये समाधान शिबीर राबवले जात आहे. नीतिमूल्य आयोगाच्या मूल्यांकनानुसार उस्मानाबाद जिल्हा मागास म्हणून जाहीर झालेला आहे ,यास्तव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडवणीस यांच्या संकल्पनेतून समाधान योजना प्रा.सुधीर पाटील यांच्या यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडळांमध्ये राबवली जात आहे. याप्रसंगी मंडळाधिकारी माळी यांनी शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची संपूर्ण माहिती उपस्थित लाभार्थ्यांना दिली. तलाठी नागटिळक, ग्रामसेवक गरड ,महावितरण चे वैष्णव, सेतू सुविधा केंद्राचे ढोले ,सचिन उकरंडे,विकी चव्हाण,सुरज अवधूत ,पांडुरंग घुले विजय शिंदे, अप्पा वाघमारे, विश्वनाथ जगदाळे ,पंकज इनामदार, भुजबळ आशिष, बाबुराव रकटे ,मुन्ना सरवदे तसेच आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व कर्मचारी यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.