जिल्हा परिषद बांधकाम विभागातील ठेकेदारांची ध्वजदिन निधीसाठी मदत:जिल्हाधिकाऱ्यांकडे केला 51 हजारांचा धनादेश सुपूर्द:

रिपोर्टर:-जिल्हाधिकारी व अध्यक्ष, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय उस्मानाबाद यांच्या आवाहनास प्रतिसाद देत जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत कार्यरत ठेकेदारांनी स्वयंस्फूर्तीने ध्वजदिन निधीस सढळ हस्ते मदत करून 51 हजाराचा धनादेश जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे आज सुपूर्द केला.

यावेळी जिल्हा सैनिक कार्यालयाच्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर फिरासत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, कार्यकारी अभियंता बांधकाम जिल्हा परिषद, नितीन भोसले आणि ठेकेदारांचे प्रतिनिधी म्हणून बी.एम.कांबळे,भातलवंडे हे उपस्थित होते.
यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विकास विभागातील कर्मचारी मकरंद कुलकर्णी,आर.एन.शिंदे,सचिन कुलकर्णी,एस.एस.कुंभार,मेघराज शिंदे यांनी पुढाकार घेतला.
या सर्वांचा आदर्श घेऊन जिल्ह्यातील दानशूर व्यक्तींनीही जिल्हा सैनिक कल्याणाकरिता पुढाकार घेऊन ध्वजदिन निधीसाठी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर फिरासत यांनी केले आहे.