
शासन प्रशासन आणि खाजगी संस्था यांच्या दररोजच्या कामकाजामधील
भ्रष्टाचाराला आळा बसावा म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय काम करते.त्यामुळे वर्षाकाटी ब—याच कारवाया लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाला कराव्या लागतात.त्याप्रमाणेच 2018या गेलेल्या वर्षात उस्मानाबाद जिल्हयामध्ये या कार्यालयाच्या माध्यमातुन एकुन 30 कारवाया करूण 43 आरोपी पकडण्यात आले.यामध्ये महसुल विभाग आग्रेसर आसुन महसुल विभागामध्ये 2018 सालामध्ये एकुन 8 कारवाया करण्यात आल्या आहेत.त्याचबरोबर ग्रामविकास म्हणजेच जिल्हापरिषद आणि पंचायत समिती मध्ये ही वर्षभरात एकुन 8 कारवाया करण्यात आल्या आहेत.तसेच भुमीअभिलेखा कार्यालय,पोलीस विभग आणि महावितरण मध्ये प्रतेकी दोन कारवाया वर्षभरात करण्यात आल्या आहेत. वस्तु व सेवा कर कार्यालय 1 हिवताप कार्यालय 1 राज्य उत्पादन शुल्क 1 वन विभाग 1 डिडीआर कार्यालय म्हणजेच सहकार विभाग 1 तर खाजगी 2 आशा एकुन 30 करवाया 2018 सालामध्ये करण्यात आल्या. महावितरण आणि सेलटॉक्स कार्यालयातील कारवाया 1 लाख रूपये रक्कमेच्या आसुन झालेल्या कारवायामध्ये या दोन कारवाया मोठया रकमेच्या आसल्याची माहीती एसीबीचे उपअधिक्षक बी,व्ही,गावडे यांनी दिली.