भुम,परंडा,वाशी मित्रमंडळाच्या वतीने 20 जानेवारी रोजी पुरस्कार सन्मान सोहळयाचे आयोजन: विविध क्षेत्रातील व्यक्तीचा होणार सन्मान:


रिपोर्टर: विविध क्षेत्रामध्ये लोकहीतवादी आणि उत्कृष्ठ काम करणा—या व्यक्तीचा रत्न पुरस्कार देवून गौरव आणि त्याच्या कार्याला प्रोत्सान देण्यासाठी दर वर्षी भुम,परंडा,वाशी मित्रमंडळाच्या वतीने घेण्यात येणारा रत्न पुरस्कार सोहळा येत्या 20 जानेवारी रोजी उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आला आसुन या सोहळयामध्ये विविध क्षेत्रातील  मान्यवरांना सन्मानीत करण्यात येणार आहे.

उस्मानाबाद येथिल स्वस्तिक मंगलकार्यालय बार्शी नाका येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आसुन या कार्यक्रमाला उस्मानाबद कळंब चे आमदार राणा​जगजितसिंह पाटील,भुम,परंडा,वाशी चे आमदार राहुल मोटे,आमदार सुजितसिंह ठाकुर,केद्रिंय रेल्वे बोर्डाचे सदस्य शंकरराव बोरकर,डॉ.प्रतापसिंह पाटील,प्रशांत चेडे यांच्या हास्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.या सोहळयामध्ये सन्मानीत होणा—या व्यक्तीमध्ये सुर्यकांत सुखदेव भोईटे यांना कृषी,व्यापार अरूणराव आनंदराव भराटे,क्रिडा महाराष्ट्र केसरी बाळासाहेब ज्ञानदेव पडघण,उदयोग क्षेत्र ओएसिस मिल्क गिरवली,प्रशासन विभाग उपजिल्हाधिकारी रामचंद्र सुखदेव चोबे,कला क्षेत्र वैभव एकनाथ बेलसरे, सामाजीक क्षेत्र विर भगतसिंग अकॉडमी ईट,शिक्षण क्षेत्र जगदाळे मामा शिक्षण संस्था वाशी,भुम तालुक्यातील पाटसांगवी ग्रामस्त आणि परंडा तालुक्यातील लगोंटवाडी ग्रामस्त यांना पाणी फाउंडीशन या कामाबददल विशेष पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात येणार आहे.आशा प्रकारे विविध क्षेत्रामध्ये कौतुकास्पद कार्य करणा—या व्यकतीचा सन्मान आणि सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.