
रिपोर्टर: भूम,परंडा,वाशी या तीन तालुक्यातील विकासात्मक आणि सामाजीक विषयाला वाचा फोडून पत्रकारिता करण्या—या पत्रकारांनी उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन कर्मविर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
-पत्रकारिता हा समाजाचा आरसा आहे.लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. वंचित-उपेक्षित भागात तर पत्रकारितेचं महत्व न्यायासाठी अधिक आधारभुत आहे.कर्मविर परिवार यासाठी सतत आग्रही असून कृतिशील विकासाला चालना देतानाच प्रत्यक्ष कृतीवर भर देत आहे. आपल्या परांडा-भूम-वाशी मधील पत्रकार बंधुचे सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक वाटचालीत बहुमोल योगदान आहे. सामाजिक उत्तरदायित्व सांभाळून पत्रकारिता करणार्या अशा पत्रकारितेचा कर्मविर परिवाराने सन्मान करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार
सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक क्षेत्रात लेखन व पाठपुरावा करणार्या पत्रकारांचा “कर्मवीर परिवाराच्या” वतीने "सकारात्मक पत्रकारिता पुरस्कार" देऊन गौरविण्यात येणार आहे.
पत्रकार पुरस्काराकरिता पत्रकारांनी आपली नामांकने येत्या 27 डिसेंबर पूर्वी खालील संपर्कावर पाठवावीत असे आवाहन कर्मवीर परिवार करत आहे.
या पुरस्कारामध्ये
1) विकासात्मक उत्कृष्ट पत्रकारिता "शाहीर अमर शेख पुरस्कार"
2) सामाजिक, शैक्षणिक उत्कृष्ट पत्रकारिता "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार" असे वेगळे दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम 5000 ₹ प्रत्येकी, मानचिन्ह, पुस्तक आणि सन्मानपत्र असे आहे.
पत्रकारितेत उल्लेखनीय लिखाण करणाऱ्या पत्रकारांनी आपल्या नामांकनाच्या प्रवेशिका तपशिलासह ( बातम्यांच्या छायांकित प्रतिसह) 27 डिसेंबर पूर्वी महेश शिंदे, तहसील कार्यालय जवळ, समर्थनगर,या पत्यावर पाठवावी.
संपर्क : ञानेश्वर कातुरे (758893780 ) राहुल अंधारे ( 9421358589 )
अरविंद शिंदे, रवी कापसे,कल्याण तांबे,अमित येळवे, संतोष बरचे, संतोष तोडकरी यांनी आवाहन केले आहे