उद्या बोरगावात स्त्री मुक्ती दिन सन्मान सोहळ्याचे आयोजन


सामाजिक कार्यकर्ते संजय वानखडे यांचा उपक्रम 
एक हजार  अनाथ गरजुना भोजन सह कपडे वितरण 
 रिपोर्टर:आकोला,बोरगाव मंजू 
आजच्या काळात माणूसपण हरविले  आहे. अशी ओरड होत.  असतानाच आजही माणुसकी जिवंत आहे. याचे उदाहरण म्हणुन बोरगावातील एक ध्येय वेडा माणूस म्हणून संजय वानखडे यांचे नाव निश्चित पुढे आहे. आपली स्वताची  परिस्थिती साधारण परंतु सामाजिक बांधिलकी जोपासून  धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य.गत दशका पासून  वंचित घटकांना दरवर्षी  स्त्री. मुक्ती दिनाचे औचित्य साधून एक हजार गरजु. गरीब, अपंग, निराधार, विध्वा महिला व पुरुष यांना  भोजन, सह नवीन कपडे इतर करून  सन्मानित केले जाते. तर या सन्मान सोहळ्याचे भव्य दिव्य  मगळवारी 25 डिसेंबर रोजी  सायंकाळी बोरगाव मंजु येथील सिद्धार्थ नगर स्थित  आयोजन करण्यात आले. आहे. दरम्यान संजय वानखडे  सामाजिक दायित्व म्हणून  भर उन्हाळ्यात आठवडी बाजारात शुद्ध पाणी  वाटसरू सह बाजारकरु साठी  उपलब्ध करून देतात. गरजु विद्यार्थ्यां करीता  शैक्षणिक उपक्रम सह साहित्य वितरित. आदी समाज प्रबोधन कार्य करीत आहेत. तर या  वर्षी सुद्धा  एक हजार अनाथ, गरीब, अपंग, महीला, पुरुष सन्मान करण्यात येत असून भोजन, सह नविन कपडे वितरण समारंभ आयोजित करण्यात येत असून या  कार्यक्रमाला  सामाजिक बांधिलकी जोपासून  बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन  सामाजिक कार्यकर्ते ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य सचिव संजय वानखडे यांनी केले आहे.