स्त्री मुक्ती दिनी पाचशे गोरगरीब महिलांना साडी चोळी वाटप बोरगावमंजुतील सामाजिक कार्यकर्ते संजय वानखडे यांचा उपक्रम:




 बोरगाव मंजू रिपोर्टर:


  डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करीत  महिलांना  खुले व्यासपिट उपलब्ध करून दिले त्या मुळे सर्वत्र   25 डिसेंबरला स्त्री मुक्ती साजरा केला जातो .  ह्या दिनाचे  औचित्य साधून बोरगावमंजूत   गरीब, अपंग, निराधार, विधावा अशा पाचशे  महिलांना   साडी चोळी ,तसेच अपग पुरुषांना कपडे  वितरण उपक्रम सामाजिक कार्यकर्ते संजय वानखडे हे गत दहा वर्षांपासून सामाजिक दायित्व   निभावत असल्याने त्याच्या सामाजिक बांधिलकी चे कोतुक सर्वत्र केल्या जात आहे


प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई वाघोडे ह्या होत्या, तर प्रमुख उपस्थिती माजी राज्यमंत्री डाॅ. डि. एम. भांडे, ठाणेदार विजय मगर, पत्रकार देविदास चव्हाण, ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य  उपाध्यक्ष पि. एन. बोळे, शेतकरी जागर मंच चे प्रशांत गावंडे, निर्भय बनो जन आंदोलनाचे गजानन हरणे,केशव खेडकर, माजी जी.प. सदस्य  सै.मझहर अली , ग्राम पंचायत सदस्य ज्ञानेश्वर वानखडे,  आर.ए.देशमुख ,  भारिप बहुजन जिल्हा प्रसिध्दी प्रमुख डॉ.  प्रंसजीत गवई,  उपाध्यक्ष श्रीकांत ढगेकर, विलास देशमुख,  अशोक तायडे,प्रदिप वानखडे,रामराव चोटमल,  न्यामत शहा, अजय देशमुख, गणेश खोडे, गजानन वसतकार,  आदी उपस्थित होते.
यावेळी
 गरजु, गरीब, अपंग, निराधार, महिला व पुरुष यांना कपडे,  साळी चोळी, सह भोजन देवुन सन्मानित करण्यात आले.  कार्यक्रमाचे  आयोजन सामाजिक कार्यकर्ते ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य सचिव संजय वानखडे यांनी स्व खर्चातून केले  हे उल्लेखनीय कार्य केले. दरम्यान उपस्थित जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई वाघोडे ह्यानी आपले विचार व्यक्त केले. आज खर्या अर्थाने समाजातील शेवटच्या घटकाला भौतिक सह  अन्न, वस्त्र, निवारा , शिक्षण मुलभूत सुविधा सामाजिक दायित्व म्हणून संजय वानखडे हे गत दशका पासून मोलाची कामगिरी करून खर्या अर्थाने संत गाडगे महाराज यांना अभिप्रेत कार्य करीत आहेत हा आदर्श  समाजातील  इतरांनी अनुकरण करून घेतला पाहिजे  असे आवाहन केले.
 तर माजी राज्यमंत्री डाॅ. डि. एम. भांडे ठाणेदार विजय मगर, देविदास चव्हाण, पि. एन. बोळे, प्रशांत गावंडे, प्रंसजीत गवई, ज्ञानेश्वर वानखडे.आदीनी आपले विचार व्यक्त करून उपस्थितांचे हस्ते पाचशे महिलांना नवीन साडी, चोळी सह कापड वितरण करून सन्मानित करण्यात आले. प्रसंगी  संजय वानखडे ह्याची मुलगी मैत्री हिलाही उपस्थितांनी सन्मानित केले. प्रसंगी कार्यक्रमाचे संचालन संतोष चक्रनारायण, प्रास्ताविक आयोजक संजय वानखडे,  आभार सखाराम वानखडे ह्यानी केले. प्रसंगी बहुसंख्य महीला, पुरुष, अबालवृद सह उपस्थित होते.