रिपोर्टर: प्रशिक्षित मानवधन असलेले देशच महासत्ता बनतात. जर प्राथमिक शिक्षकांनी बाल वयात योग्य संस्कार करून पिढी घडवली तर भारत देश महासत्ता होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही" अशा प्रकारचा आशावाद महाराष्ट्राचे ख्यातनाम वक्ते प्रदीप सोळुंके यांनी व्यक्त केला.
परंडा येथील कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे शिक्षक सह पतसंस्थेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा फुले स्मृतिदिना निमित्ताने पंचायत समिती च्या सभागृहात
आयोजित गुणवंत पुरस्कार सोहळ्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रदीप सोळुंके बोलत होते. या प्रसंगी राजकीय विश्लेषक संजय मिस्किन यांच्या हस्ते गुणवंतांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती सौ. प्रणिती मोरे, प्रमुख पाहुणे म्हणून जि.म.स.बँकेचे मा.उपाध्यक्ष adv सुभाषराव मोरे, जि प मा उपाध्यक्ष adv दादासाहेब खरसडे, सत्कारमूर्ती डॉ प्रतापसिंह पाटील, गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर, उपसभापती सुधाकर कोकाटे, गटविकास अधिकारी अशोक खुळे, प्रा तुषार वाघमारे, adv अजय खरसडे इ. मान्यवर उपस्थित होते
या प्रसंगी मार्गदर्शन करताना संजय मिस्किन म्हणाले की
"आम्हाला समाजात बदल करायचा आहे तो फक्त शिक्षणातून करता येतो, त्यासाठी आम्ही जि.प. ची प्रत्येक शाळा प्रगत करण्याचा प्रयत्न करणार असून 2025 पर्यंत तालुक्यातील किमान 800 मुलांना जर्मन, चायनीज, फ्रेंच, जपानी या भाषा शिकवून आम्ही परंडा पॅटर्न निर्माण करणार आहोत "
या प्रसंगी आदर्श संस्थाचालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यांचा झाला सन्मान:
10 शिक्षक,1 साधन व्यक्ती,1शिक्षकेत्तर कर्मचारी,1 संस्थापक,1शालेय व्यवस्थापन समिती ,3 शाळा सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते,पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे...धनेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रतापसिंह पाटील संस्थापक,करिअर कमांडो अकॅडमी चे महावीर तनपुरे, महेश शिंदे कंडारी, विनोद सुरवसे पवार नगर, मनिषा कुलकर्णी शेळगाव, पंजाब खंदारे देवगाव खुर्द, विनायक शेळके खानापूर, रामकुवर घोगरे कोकणेवस्ती, मनोज कोळी राजुरी, उज्वला सोनवणे भांडगाव, भागवत घोगरे हिंगणगाव खुर्द, अविनाश पवार ब्रह्मगाव,अकबर तांबोळी सेवक,दिनकर साबळे साधनव्यक्ति,कर्मवीर डॉ भाऊराव पाटील उपक्रम शील आदर्श शाळा म्हणून प्रा शा साकत खुर्द पश्चिम (प्राथमिक),प्रा शा, टाकळी(उच्च प्राथमिक)बावची विद्यालय बावची(माध्यमिक) शालेय व्यवस्थापन समितीप्रा शा घारगाव