रिपोर्टर: जिल्हयातील सहकार क्षेत्र मोडकळीस निघाले असताना अशा काळात रूपामाता परिवारा ने सहकार क्षेत्रात सर्वांपुढे आदर्श निर्माण केला, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी डा.चेतन गिरासे यांने केले.

रूपामाता अर्बन व मल्टीस्टेटच्या वतीने डायरी व दिनदर्शिका चे प्रकाशन शुक्रवार दि.२८ डिसेंबर रोजी डॉ.गिरासे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रूपामाता परिवाराचे अध्यक्ष अॅड.व्यंकटराव गुंड उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य ज्ञानदेव राजगुरू, रूपामाताचे संचालक राजाभाऊ वैद्य यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ.गिरासे म्हणाले की, विविध क्षेत्रात रूपामाता परिवाराने चालु केलेली घौडदौंड कौतुकास्पद आहे, असे सांगितले. अध्यक्षस्थानावरून बोलताना अॅड.व्यंकटराव गुंड यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणुन जिल्हयाची ओळख आहे. ही ओळख पुसण्यासाठी अल्पसा प्रयत्न चालु आहेत. जिल्हयात सहकार क्षेत्र अधोगतीला जात असताना रूपामाता परिवार पुर्व दक्षता घेऊन काळजीपुर्वक पाऊल टाकत आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न करीत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन मुख्यकार्यकारी संचालक भगिरथ जोशी यांनी केले. यावेळी कार्यक्रमास उद्योजक रावसाहेब कोळगे, राजाभाऊ कोचेटा, रूपामाता अर्बन व मल्टीस्टेटचे संचालक शरद गुंड, कायदेशीर सल्लागार अॅड.विद्युलता दजभंजन, धनंजय वाघमोडे, दयानंद वाघमारे आदींची उपस्थिती होती.