जिल्हयात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून मदत व्हावी:जिल्हा नियोजन समिती बैठकीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची मागणी:


                   

रिपोर्टर: जिल्हयात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तुळजाभवानी संस्थानकडे उपलब्ध आसलेल्या ठेवीतुन दुष्काळ निवारणाच्या कामासाठी मदत करावी आशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत केली.जिल्हा वार्षिक योजना समितीची बैठक सर्व सदस्यांच्या उपस्थितीत मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बैठक सभागृहात संपन्न झाली, यावेळी आमदार मधुकरराव चव्हाण, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार राहुल मोटे, शिक्षक आमदार विक्रम काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्चना पाटील, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते हे उपस्थित होते.
तुळजाभवानी मंदिर ट्रस्टकडे उपलब्ध असलेल्या जवळपास रु.१४२ कोटीच्या ठेवीतून कांही रक्कम जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थीतीत आवश्यक त्या उपाय योजना राबविण्यासाठी उपलब्ध करुन देण्याची मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील,यांनी मागील जिल्हाधिकारी तथा ट्रस्टचे अध्यक्ष गमे यांच्याकडे देखील लेखी पत्र देवून केली होती. या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी सदरील विषय आगामी ट्रस्टच्या बैठकीमध्ये ठेवण्याच्या सुचना दिल्या असल्याचे उपविभागीय अधिकारी  गिरासे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.