जलसंधारण काळाची गरज — शरण पाटील

                                                    रिपोर्टर: देशाला सक्षम बनविण्याकरिता गावागावांमध्ये लोकसहभाग वाढला पाहिजे. जल व्यवस्थापन व जलसंवर्धन करण्याकरिता तरुणांनी एकत्रित येवून गावचा विकास करणे गरजेचे असून जलसंधारण काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील यांनी केले.   
  उमरगा तालुक्यातील काळनिंबाळा येथे दि.27 डिसेंबर रोजी श्री माधवराव पाटील महाविद्यालय व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना 'जलसंवर्धन व जलव्यवस्थापन वार्षिक विशेष शिबीर समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन शरण पाटील बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे गटनेते प्रकाश आष्टे, जिल्हा परिषदेचे सदस्य धनराज हिरमुखे, माजी जि.प. सदस्य दिलीप भालेराव, लातूरचे प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड, सरपंच सीमा टिकांबरे, उपसरपंच लक्ष्मीबाई सगर, ग्रामसेवक इगवे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सोमशंकर नवटके, विकासेसोचे चेअरमन दिगंबर पाटील, धनराज टिकांबरे, नगरसेवक महेश माशाळकर, प्राचार्य डॉ.अशोक सपाटे, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, इकबाल पटेल,  महालिंगाप्पा बाबशेट्टी, मुख्याध्यापक सरवदे, राजु मुल्ला,अदि उपस्थित होते.                                                     यावेळी शरण पाटील पुढे बोलताना म्हणाले की, ग्रामीण भागाच्या विकासामध्ये तरुणांचा  सहभाग वाढला पाहिजे. देशातील तरुण विधायक कामासाठी एकत्रित येवून मानसिक, बौद्धिक व शारीरिक दृष्ट्या सक्षम बनले पाहिजे. तरुणांनी व्यसनांच्या आहारी न जाता देशाला सक्षम बनविले पाहिजे. यावेळी प्रकाश आष्टे, दिगंबर पाटील, दिलीप भालेराव, डॉ. श्रीकांत गायकवाड, आदिंनी मनोगत व्यक्त केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी  राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.राम बजगिरे, डॉ. जयश्री सोमवंशी, प्रकाश टिकांबरे, प्रा. प्रकाश कुलकर्णी, दिलीप घाटे, मशाक कागदी, विद्यार्थी प्रतिनिधी मारुती इंगळे, किशोर कारभारी आदिंनी पुढाकार घेतला होता.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.अशोक सपाटे व सूत्रसंचालन प्रा.डॉ.सुभाष हुलपल्ले यांनी केले तर आभार प्रा.डॉ.विलास खडके यांनी मानले. या कार्यक्रमास विद्यार्थी, विद्यार्थीनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.