तेरमध्ये युवकांनी राबवले महास्वच्छता मोहिम बेंबळी, खेड व तेरमधील ग्रामसेवा ग्रुपची सेवा


रिपोर्टर: प्रत्येक रविवारी सुट्टी गाठून सकाळी दोन तास गावात स्वच्छतेसह विविध सामाजिक उपक्रम राबविणार्‍या तालु्नयातील बेंबळी येथील ग्रामसेवा ग्रुप, खेड येथील ग्रामसेवा युवा संघ व तेर येथे नव्याने निर्माण झालेल्या ग्रामसेवा ग्रुपच्या संयु्नत विद्यमाने रविवारी तेरमध्ये महास्वच्छता मोहिम राबविण्यात आली. तिन्ही गावातील शेकडो सदस्यांनी स्वच्छता करत स्वच्छतेचा संदेशही घराघरात पोहचवला आहे.
उस्मानाबाद तालु्नयातील तेर हे संत गोरोबाकाका, प्राचीन बाजारपेठ, पुरातन वस्तू संग्रहालय, कार्तिकी स्वामींचे मंदीर व अन्य ऐतिहासिक स्थळांमुळे राज्यासह देशभरात प्रसिध्द आहे. सार्वजनिक ठिकाणी प्लास्टीकचा कचरा तसेच अन्य प्रकारचा घनकचरा साचल्याने मोठी दुर्गंधी पसरून नागरिक आजारी पडत असल्याचे चित्र वारंवार दिसून येत आहे. या दुर्दैवी वास्तवाची तीव्रता कमी करण्यासाठी तेर येथील शिक्षक, वकील, पत्रकार, पुजारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यावसायिक व अन्य शासकीय, खासगी क्षेत्रातील नोकरदार युवकांनी एकत्र येत गावात वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांच्या आयोजनाचा संकल्प केला. प्रत्येक रविवारी गावातील युवकांनी एकत्र येत बसस्थानक, रूग्णालय परिसर यापूर्वी स्वच्छ केला. 30 डिसेंबर रोजी बेंबळी येथील ग्रुपचा 97 वा रविवार, खेड येथील ग्रुपचा 23 वा ग्रामसेवेचा रविवार होता. या दिवसाचे औचीत्य साधून तेरमध्येही ग्रामसेवा ग्रुपची निर्मिती करण्यात आली.
तेर येथील रामलिंगआप्पा लामतुरे पुरातन वस्तुसंग्रहालय, बसस्थानक, गावांतर्गत चौक, रस्ते, मंदिरे, समाजमंदिरांसह संत गोरोबाकाका मंदिराशेजारी असलेल्या तेरणा नदीपात्रातील घाटपायर्‍या आणि मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर तिन्ही ग्रुपमधील युवकांनी एकमेकांच्या ओळखी करून देत सामाजिक उपक्रमांविषयी चर्चा केली. यावेळी तेर येथील सदस्यांसह भाविकही उपस्थित होते.