रिपोर्टर: उस्मानाबाद नगरपरिषदेच्या माध्यमातुन शहरातील मालमत्ता करासाठी केलेला सर्वे चुकीचा आसुन तो रदद करण्यात यावा यासाठी आज झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी पक्षाचे नगर सेवक व पालीकेचे विरोधी पक्ष नेते युवराज नळे यांनी आवाज उठवत नाशिक महापालिका फेरसर्वेक्षण करण्याचा निर्णय घेत असेल तर उस्मानाबाद पालिका का करत नाही आसा प्रश्न उपस्थित केला.परंतु मधेच या प्रश्नामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये गोंधळ झाल्याने सभा नगर अध्यक्षाच्या आदेश नुसार थंबवण्यात आली.
सर्वेक्षण करणाऱ्या यंत्रणेने चुका केल्या म्हणून नाशिक महापालिका फेरसर्वेक्षण करत असेल तर नागरिकांना इतरांच्या चुकीने होणारा नाहक त्रास कमी करण्यासाठी उस्मानाबाद नगरपालिका असा निर्णय का घेत नाही.आजच्या सभेतून नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांना कंत्राटदारांची घरे भरण्यासाठी जनतेच्या खिशावर कराच्या माध्यमातून दरोडा घालायचा आहे हे स्पष्ट झाले आहे.चुकीच्या पद्धतीने सर्व्हे केल्यामुळे शहरातील जनता प्रचंड त्रस्त आहे.आज याबाबत कांही तरी सकारात्मक निर्णय होईल या आशेवर उस्मानाबादची जनता होती. त्यांना जनतेचे प्रश्न गौण वाटत आहेत.नगरपरिषद अधिनियमाच्या कलम ८१/८ अन्वये नागरिकांना सर्वसाधारण सभेत बसण्याचा अधिकार असताना त्यांना प्रवेश नाकारून राजेनिंबाळकर यांनी त्यांना बसण्यास मनाई केली. याबाबत आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार असून.नागरिकांचे हित लक्षात घेऊन सत्ताधाऱ्यांनी आज सभेत चर्चा करून त्यांना दिलासा द्यायचा सोडून पळून जात कोरम पूर्ण होणार नाही याची काळजी घेतली.जे कायद्याच्या पुस्तकात आहे तेच आम्ही सभेत सांगत असताना नगराध्यक्ष यांनी राष्ट्रवादी चुकीची माहिती देत असल्याचे विधान केले आहे आमचं त्यांना एवढं सांगणं आहे की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर आम्ही चुकीचं बोलत असलो तर त्यांनी याबाबत खर काय आहे ते उस्मानाबादच्या जनतेला सांगावं.सत्ताधारी नगरसेवकांनी सभेत यायचं सोडून नागरध्यक्षांच्या अँटी चेंबरला बसने पसंद केले हे अत्यंत दुर्दैवी आहे.सत्ताधाऱ्यांनी नागरिकांवर लादलेला जिझिया कर रद्द करण्यासाठी जो पर्यंत फेरसर्वेक्षण करण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी स्वस्थ बसणार नाही.आसे युवराज नळे यांनी पत्रकाव्दारे मत व्यक्त केले आहे.