तेरणा आणि तुळजाभवानीही आम्हीच चालु करणार: आ.राणाजगजितसिंह पाटील.रिपोर्टर.. कळंब तालुक्यातील हावरगाव येथिल डीएनएस एफ.ए हा कारखाना पुर्ण ताकतीने चालवून या भागातील शेतक—यांच्या आडचनी सोडवून लवकरच पुढील वर्षी पर्यत जिल्हयामधील तेरणा,तुळजाभवानी ही दोन्ही कारखाने चालु करणार आसल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी हावरगाव येथिल कै,चंद्रकलादेवी नगर येथे कारखाण्याच्या गळीत हंगामाच्या उदघाटनावेळी सांगीतले. या कार्यक्रमाला डीएनएस चे चेअरमन दिलीप नाडे,आमदार राहुल मोटे,युवा नेते मल्हार पाटील,जिवनराव गारे,जि,प,अध्यक्ष नेताजी पाटील,उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील,सुरेश बिरजदार,रेवनसिध्द लामतुरे,सतिष दंडनाईक तसेच कळंब तालुक्यातील पंचायत समीती सभापतीसह इतर कार्यकर्ते आणि परिसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.