शिक्षण विभागाला जानिवपुर्वक कमी निधी:राजकिय डावपेचामुळे जिल्हपरिषद शाळेचे दिड लाख विदयार्थी टार्गेट: अर्चनाताई पाटील..


रिपोर्टर:     7 तारखेला पार पडलेल्या जिल्हा नियोजन समीतीच्या बैठकीमध्ये झालेल्या निधीच्या वाटपामध्ये जिल्हापरिषदेच्या शिक्षण विभागाला जानिवपुर्वक निधी कमी दिला आसुन फक्त राजकीय डावपेचामुळे जिल्हापरिषद शाळेत शिकणारे दिड लाख विदयार्थी काही सुविधा पासुन वंचीत रहाणार आहेत आशी माहीती जिल्हापरिषद उपाध्यक्षा व शिक्षण सभापती अर्चनाताई पाटील यांनी आयोजीत पत्रकार ​परिषदेमध्ये दिली.

जिल्हयात दुष्काळी परिस्थिती आसताना इतर सर्व बाबी बरोबर शिक्षण ही महत्वाचे आहे त्यामुळे जिल्हयातील जिल्हापरिषद शाळेमध्ये शिकणा—या विदयार्थ्याच्या भवितव्यासाठी भरघोष निधीची आवश्यकता आसताना फक्त 3.00 कोटी रूपये निधी मंजुर केला आसुन या निधीमध्ये शाळेतील मुलींची स्वच्छतागृह,सुरक्षीत व स्वच्छ पिण्याचे पाणी,खोली बांधकाम विदयार्थ्याी वाढीसाठी काही महत्वाच्या सोई सुविधा हे संगळ करण्यासाठी हा निधी पुरेसा नसल्याने विदयार्थ्याचे नुकसान होवू शकते त्याला कोन जिम्मेदार राहाणार आसा प्रश्न अर्चनाताई पाटील यांनी उपस्थित केला. मागील वर्षी शिक्षणासाठी 6.50 कोटी,तर या वर्षी 3.00 कोटी, आरोग्याला मागच्या वर्षी 15.94 कोटी तर या वर्षी 5.75 कोटी इतकी करण्यात आली आहे. आजपर्यत उस्मानाबाद जिल्हयात सर्वात जास्त आत्महात्या झाल्या आसुन याही वर्षी दुष्काळी परिस्थ्तिी निर्माण झाली आहे. जिल्हयामध्ये बळीराजा चेतना अभियान राबवले जाते त्याच जिल्हयातील शेतक—यांच्या आरोग्यासाठी एवढा कमी निधी दिलेला आहे.सादर केलेल्या 156 कोटीच्या आराखडयामध्ये शिक्षण विभगासाठी फक्त 1.92 टक्के एवढीच तरतुत ठेवण्यात आली आहे. या राजकारण आणि जानिवपुर्वक केलेल्या खोडसाळपणाच्या विरोधात आम्ही आवाज उठवणार आसल्याचे ही आर्चनाई पाटील यांनी या वेळी सांगीतले.