ढोकी येथे स्त्री-पुरुष समानता राज्य स्तरीय चर्चासत्र:



रिपोर्टर: वसंतराव काळे महाविद्यालय, ढोकी येथे आज दि. 01/12/2018 रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोग व वसंतराव काळे महाविद्यालय, ढोकी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय अंतर विद्या शाखीय राज्य स्तरीय चर्चासत्र स्त्री-पुरुष समानता आणि महिला सक्षमीकरण या विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या चर्चासत्रामध्ये बोलत असतांना जि. प. उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी महिलांनी स्वावलंबी व्हावे असे आवाहन केले. ग्रामीण भागातील महिला आज सक्षम होत आहेत, सर्वच क्षेत्रामध्ये मुली आघाडीवर जात असल्याचे देखील त्यांनी सांगीतले.
या कार्यक्रमाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मा. कुलगुरु श्री. मधुकर गायकवाड, वसंतराव काळे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. हरिदास फेरे, रेणूका भावसार, अॅङ मनिषा तोकले, तसेच पुरुष, महिला व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.