डॉ.माधुरी सोनटक्के -हुंडेकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार


उस्मानाबाद
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूरच्या प्रा.डॉ.माधुरी सोनटक्के-हुंडेकर यांना कोल्हापुर येथील मुक्ता फाऊंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. 
कोल्हापुर येथील मुक्ता फाऊंडेशन तर्फे राज्यातील आदर्श शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. कोल्हापूर येथील छ.शाहू स्मारक भवन येथे भव्य कार्यक्रमात माजी आ. भगवानराव साळुंखे आणि प्राचार्य टी.एस. पाटील यांच्या शुभहस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या सोबत काम करणा-या फातिमा शेख यांच्या नावे हा पुरस्कार मुक्त फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येतो. डॉ. माधुरी सोनटक्के यांचे स्त्री विषयक लेखन आणि साहित्याच्या अनुशंगाने त्यांची ह्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
डॉ. माधुरी सोनटक्के यांच्या निवडी बददल बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. मधुकरराव चव्हाण, माजी आ. नरेंद्र बोरगांवकर, सचिव उल्हास बोरगावकर, प्राचार्य डा.संजय कोरेकर, अशोक मगर तसेच महाविद्यालयातील संपुर्ण स्टाफ ने त्यांचे अभिनंदन केले.