रिपोर्टर: मुख्य निवडणूक अधिकारी , महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशान्वये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट संदर्भात प्रशिक्षण व जनजागृती करण्यास मान्यता दिली आहे. दि.20 डिसेंबर 2018 ते दि. 14 फेब्रुवारी 2019 या कालावधीत जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर प्रशिक्षण व जनजागृती मोहीम सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती दिपा मुधोळ –मुंडे, यांच्या हस्ते जिल्हा स्तरावर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्र प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमाचे आज सकाळी 11.00 वा. सेतू सुविधा कार्यालय,उस्मानाबाद येथे उदघाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी ईव्हीएम व व्हीव्हीपीऍट मशीनवर मतदानाचे प्रात्यक्षिक करुन दाखविले तसेच सर्व मतदार व राजकीय पक्षांना या कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत आवाहन केले.
या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी श्री. पराग सोमण,उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्री.निलेश श्रींगी, उपविभागीय अधिकारी श्री.चेतन गिरासे, उस्मानाबाद, तहसिलदार श्री. विजय राऊत, नायब तहसिलदार निवडणूक श्री.चेतन पाटील,उप कोषागार अधिकारी श्री. शिवलिंग साखरे तसेच विविध कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.