उस्मानाबाद येथिल एचडीएफसी बॅंकेच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन:जिल्हा पोलीस अधिक्षक आर.राजा यांच्या हास्ते उदघाटन:रिपोर्टर: उस्मानबाद येथिल एचडीएफसी बॅंकेच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराचे उदघाटन उस्मानाबाद चे जिल्हा पोलीस अधिक्षक आर.राजा यांच्या हास्ते करण्यात आले.यावेळी डॉ.आश्वीनी गोरे एचडीएफसी बॅंकेचे डेपुटी मॅंनेजर महेश टकले पत्रकार  मोतीचंद बेदमुता,श्रीराम क्षीरसागर यांच्या सह बॅंकेतील पदाधिकारी,कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

सामाजीक कामामध्ये आग्रेसर आसलेली बॅंक म्हणून ओळख आसणारी  एचडीएफसी बॅंक नेहमीच रक्तदान,वृक्ष लागवड,आश्रम शाळेला शैक्षणीक साहीत्याचे वाटप आशा प्रकारच्या सामाजीक कार्यक्रमाचे आयोजन करत आसते.या प्रमाणेच आज दि.7 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता रक्तदान शिबीराचे उदघाटन जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या हास्ते दिप प्रोजलन करूण करण्यात आले.या शिबीरामध्ये मोठया संख्येने बॅंकेच्या कर्मचा—यांसह रक्तदात्यानी सहभाग नोंदवला.