
रिपोर्टर: एस टी कामगारांचा वेतनवाढ कराराची मूदत संपून तीन वर्ष झाली परंतू अदयाप करार झाला नाही त्यामूळे प्रशासनाच्या विरोधातील आपला लढा चालूच राहील आसे मत हनुमंत ताटे यांनी व्यक्त केले.
एस टी कामगार संघटनेच्या वतीने उस्मानाबाद येथिल कामगार भवन येथे आयोजीत एस टी कामगाराच्या मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे विभागाचे अध्यक्ष मधूकर अनभूले हे होते. कामगार नेते कै भाऊ फाटक व कै विलास दादा शिंदे याच्या प्रतीमेची पूजा करून कार्यक्रमाला सूरवात करण्यात आली. प्रास्तावीक संघटनेचे वि सचीव शरद राउत यानी केले यावेळी खात्यातर्गत बढती परीक्षा पास झालेल्या कर्मचार्याचा सत्कार करण्यात आला तसेच अनेक संघटनेतून कामगार संघटनेत प्रवेश केलेल्या कामगाराचा ताटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसगी सी सी एस बँकेचे चेअरमन सतीश धस संचालक ऊमाकांत गायकवाड संघटनेचे वि कार्याध्यक्ष राजेश काशीद खजीनदार लक्ष्मीकांत मूळे सर्व आगार सचीव आगार अध्यक्ष पदाधिकारी व सभासद मोठया संख्येनी.हजर होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ऋषी पवार यानी केले