उस्मानाबाद मध्ये उभारणार शासकिय डिजीटल ग्रंथालय:


15 डिसेंबर रोजी आयोजित ग्रंथोत्सवाला मोठया संख्येने उपस्थित रहाण्याचे जिल्हाग्रंथ अधिकारी यांचे आवहन: रिपोर्टर: वाचन संस्कृतीची चळवळ चालु राहुन येणा—या तरूण पिढीला त्याचा ऐतिहासिक आणि आभ्यासात्मक लाभ घेता यावा यासाठी उस्मानाबाद शहरामध्ये आधुनिक पध्दतीचे डिजीटल आसे ग्रंथालय येत्या दोन वर्षामध्ये उभारणार आसल्याची माहीती जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ.वा.सुर्यवंशी यांनी दिली.उस्मानाबाद मध्ये 15 डिंसेबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथोत्सवा निमीत्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहीती देण्यात आली.यावेळी जिल्हा माहीती अधिकारी मनोज सानप यांची उपस्थिती होती.

उस्मानाबाद जिल्हयाची शिक्षण पध्दती उत्तम आसताना सुध्दा विविध स्पर्धा परिक्षा देण्यासाठी उस्मानाबाद जिल्हयातील बरेच तरूण मोठया शहराकडे जाताना दिसतात.मार्गदर्शन आणि वाचनालयाचा अ​भाव आसल्याने स्पर्धा परिक्षाची तयारी करणा—या मुलांना आडचनीचा सामना करावा लागतो.आशा विदयार्थ्यासाठी ग्रंथालयाची नविन इमारत महत्वाची ठरणार आहे. त्याच बरोबर आजच्या आधुनिक काळात मोडखळीस आलेल्या वाचन संस्कृतीला पुन्हा चालना मिळण्याचे काम या डिजीटल ग्रंथालयामुळे होणार आहे. शासकीय स्तरावर सर्व प्रक्रीया झाल्या आसुन लवकरच शहरातील न्यायाधिश निवास स्थानाच्या पाठीमागे या इमारतीचे काम सुरू होणार आसल्याची माहीती सुर्यवंशी यांनी दिली.या इमारतीमध्ये वेगवेगळया 17 विभागाची निर्मीती केली जाणार आहे.यामध्ये ग्रंथसंग्रह विभाग,ग्रंथोपार्जन विभाग,वृत्तपत्रे नियतकालिके विभाग,ग्रंथदेवघन विभाग,संदर्भ ग्रंथ विभाग,वाचन कक्ष,महीला विभाग,बाल विभाग,अभिलेख कक्ष,प्रशासन विभाग,ग्रंथपाल कक्ष,संगणक कक्ष,ग्रंथ बांधणी विभाग,ग्रंथ प्रदर्शण विभाग व वाचन संस्कृती विभाग,तांत्रीक विभाग,अनुदान विभाग,आणि सर्वात महत्वाचा विभाग म्हणजे अंधासाठी ब्रेन लिपी विभाग आशा प्रकाच्या आशाप्रकारच्या आधुनिक पध्दतीने हे ग्रंथलय बांधले जाणार आसल्याची माहीती जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुर्यंवंशी यांली दिली. त्याच बरोबर 15 तरखेला होण्या—या ग्रंथोत्सवाला
मोठया संख्येने उपस्थित रहाण्याचे अवहान ही करण्यात आले.