जिल्हा पोलीस आधिक्षक आर.राजा यांच्या आदेशा नुसार हेल्मीट नसलेल्या पोलीसावर दंडात्मक कारवाई: पोलीसाकडुन दंड वसुल



ग्रामीण भागातील लोंकासाठी 500 रूपये दंडाची रक्कम होतेय जास्त:

रिपोर्टर:    विसरलेला हेल्मीट सक्तीचा नियम पुन्हा चालु केल्याने पोलीसांची चांगलीच पळापळ झाली.शहरातील पोलीस आधिक्षक कार्यालयासमोर हेल्मीट नियमाचा भंग करणा—या आनेक पोलीसावर कारवाई करण्यात आली त्यामध्ये 500 रूपये प्रमाणे दंड वसुुल करण्यात आला. जिल्हा पोलीस आधिक्षक आर.राजा यांच्या आदेशा नुसार ही कारवाई करण्यात आली आसुन सुरवातीला पोलीसावर कारवाई आणि नंतर जनतेवर आशा पध्दतीने उदयापासुन सगळीकडेच हेल्मीट सक्तीची कारवाई केली जाणार आहे.

होणारे आपघात टाळण्यासाठी हेल्मीटचा वापर करणे अतिशय महत्वाचे आहे त्यामुळे हेल्मीट न वापरण्या—या आणि चार चाकी गाडीमध्ये बेल्ट न लावणा—या शहरासह ग्रामीण भागातील वाहन चालकावर दंडात्मक  कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस आधिक्षक आर,राजा,यांनी दिले आहेत.परंतु प्रथम कारवाई पोलीसावर झाली पाहीजे आशी सुचना वहातुक पोलीसांना दिल्यामुळे आज उस्मानाबाद शहरातील पोलीस मुख्यालया समोर आनेक विना हेल्मीट पोलीसावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.त्यामुळे काही पोलीसांनी रिक्षाने दिवटीला येणे पसंत केले.जिल्हयात आवेद धंदया विरोधात होत आसलेल्या कारवाया पाहुन सर्वसामान्य जनता पोलीस अधिक्षकांचे कौतुक करत आहे.जिल्हयातील मटका चालकांवर होणा—या कारसवाया ही जनतेच्या समाधानाचा विषय आहे त्यामुळे नक्कीच कायदा व सुवेवस्तेच्या बाबतीत  जिल्हा पोलीस अधिक्षक आर,राजा यांच्या कडुन जिल्हयातील जनतेच्या आपेक्षा वाढलेल्या आहेत.

ग्रामीण भागातील लोकांसाठी 500 रूपये दंड होतोय जास्त:

जिल्यात संगळीकडे दुष्काळी वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतक—यासह व्यावसाईकांची सुध्दा आर्थिक स्थिती बिकट आहे.गावातुन काहीतरी कामासाठी दुस—याकडुन चारशे पाचशे रूपये उसने घेवून शहराकडे मोटार सायकलवर येणा—यांची संख्या जास्त आसते.आशा प्रकारचे काहीजन हेल्मीट सक्तीच्या कारसवाईत सापडले तर त्यांची चांगलीच परेषाणी होत आहे.किशात पैसे नसल्याने तासनतास पोलीसापाशी बसुन राहील्या शिवाय त्यांच्याकडे काहीच पर्याय नसतो.