मराठा आरक्षण हा शिवसंग्राम संघटनेचाच मुळ विषय: तानाजी शिंदे:रिपोर्टर: मराठा समाजासाठी महत्वाचा आणि ऐतिहासीक मानला जानारा मराठा आरक्षणाचा मुददा हा  शिवसंग्राम संघटनेनेच आसुन  शिवस्मारक सुध्दा आमच्याच संघटनेने मंडलेला विषय आहे.दोन्ही विषय मार्गी लागल्यााने आम्ही समाधानी आहोत आसे मत शिवसंग्रामचे प्रदेश अध्यक्ष तानाजी शिंदे यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.

शिवसंग्राम संघटनेच्या वतीने उस्मानबादमध्ये सोमवारी पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी विदयार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अविनाश खापे पाटील,गणेश बेजगुडे,पवन सुर्यवंशी,संदेश कदम यांची उपस्थिती होती.शिवस्मारकाचे काम सुरू आसुन येत्या तिन वर्षामध्ये पुर्ण होईल.त्याच बरोबर मराठा आरक्षण ही सरकारने जाहीर केल्यामुळे ते  कोर्टामध्ये टिकण्याची काळजी सुध्दा सरकारने घेतली आहे.आमची संघटना यापुढे मराठवाडयामध्ये सुशिक्षीत बेकारीचा आणि महीलासाठी लघु उदयोगाचा मुददा घेवून काम करणार आहे.आशी माहीती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी दिली. बेरोजगारी  वाढल्यामुळे परंपरेने घेतले जाणारे शिक्षण बंद करूण व्यावसाईक पध्दतीने शिक्षण घेणे गरजेचे आहे.त्यामुळे मराठवाडयातील विदयार्थ्याच्या हाताला काम मिळण्यास मदत होईल आसे मत संघटनेचे विदयार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अविनाश खापे पाटील,यांनी यावेळी व्यक्त केले.