कळंब येथे तालुकास्तरीय दिव्यांग तपासणी आणि वैद्यकीय प्रमाणपत्र वितरण शिबीराचे उद्घाटन:

 जि. प. अध्यक्ष श्री. नेताजी पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते  यांची प्रमुख उपस्थिती

रिपोर्टर: सम्रग शिक्षा अभियान, समावेशीत शिक्षण जि. प. उस्मानाबाद, जिल्हा शौक्षणिक सातत्यपूर्ण व्यवसायीक विकास संस्था, उस्मानाबाद व आरोग्य विभाग जि. प. उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने उपजिल्हा रुग्णालय कळंब येथे आयोजित तालुकास्तरीय दिव्यांग तपासणी व ऑनलाईन वैद्यकीय प्रमाणपत्र वितरण शिबीराचे उद्घाटन जि. प. उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये जिल्ह्यातील दिव्यांग नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी येता येत नाही म्हणून तालुक्याच्या ठिकाणी दिव्यांग तपासणी व ऑनलाईन वौद्यकीय प्रमाणपत्र वितरण शिबीराचे आयोजन केले असल्याचे सांगीतले. तसेच मतीमंद मुलांना रु. 10,000/- जि. प. कडून देण्यात येतात. व मतीमंद मुलांसाठी फॉर्म उपलब्ध करुन देण्यात आले आहेत तसेच दुर्धर आजारासाठी रु. 15,000/- देण्यात येतात याची देखील माहिती सांगीतली. जि. प. अध्यक्ष श्री. नेताजी पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते
यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कळंब पं.स. सभापती श्री. दत्तात्रय साळुंके, उपसभापती श्री. भगवान ओव्हाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगांवे साहेब यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.