खामसवाडी ता.कळंब येथे जि.प.उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.३०/११/२०१८ रोजी गाव विकास व टंचाई आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीस ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल डजनभर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची यावेळी हजेरी होती. सलग तिन तास चाललेल्या या बैठकीत प्रत्येकाच्या प्रश्नाला रोखठोक उत्तर देवून उपाध्यक्षा यांनी व विविध योजनांची माहिती दिली. तसेच चुकलेल्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत पुढील काळात लोकांची कामे करण्यास हयगय करू नये यासाठी सक्त ताकीद देवून तंबी दिली.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खामसवाडीसाठी परिसरातील विविध विकासकामांची घोषणा उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई यांनी केली व कार्यकर्त्यांना आणी अधिकाऱ्यांना सर्व कामे लवकरात लवकर पुर्णत्वाला नेण्यास सुचना दिल्या.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय साळुंके, जि.प.सदस्य सौ.सोनालीताई मुंडे, पं.स.सदस्य सौ. दैवाशाला पाटील, गटविकास अधिकारी श्री.राजगुरू साहेब, प्रवक्ता विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुशील शेळके, मजूर फेडरेशनचे संचालक उमाकांत मुंडे, हरिभाऊ भिंगारे, निलेश पाटील, सज्जन शेळके, संतोष शेळके, सुशील पाटील, किरण पाटील, ज्ञानेश्वर बंडगर, दयानंद पाटील, विनोद माने, विश्वास कोकणे, शरद शेळके, श्रीकांत झोरी, शेषेराव शेळके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.