जिल्हयात 8 मटका चालकावर कारवाई: 14 हाजाराचा माल जप्त:रिपोर्टर: उस्मानाबाद जिल्हयामध्ये आवेद धंदे रोखण्यासाठी जिल्हा पोलीस ​आधिक्षक आर.राजा यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज कारवाईचे धाडसत्र सुरू आसुन आज जिल्हयामध्ये 8 मटका चालकावर कारसवाई करण्यात आली आहे. पोलीस आधिक्षक आर.राजा उस्मानाबाद जिल्हयामध्ये आल्यापासुन ग्रामीण भागासह शहरी भागामध्ये भरधाव वेगाने चालनारे मटक्याचे आडडे बंद झाल्याचे दिसत आहे. पोलीस आधिक्षकाच्या या कारवायामुळे  मटक्याच्या नावाखाली बिगडत चाललेली तरूण पिढी सावरण्यास मदत होणार आहे.आज झालेल्या कारवाईमध्ये आनवर आबुबकर युसुब मोगल,भगवान यादव गरड,रा:परंडा रंजित एकनाथ हारकर रा:कळंब,गणेश वडगावे रा:युसुफ वडगाव रामदास वेलरूण,आश्पाकचॉंद शाहा उमरगा लक्ष्मण राजाराम चिळे,सोमनाथ चपणे रा:उस्मानाबाद यांच्या कडुन मुंबई कल्यान मटक्याचे साहीत्य जप्त करूण चौदा हाजार 870 रूपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.