उस्मानाबाद मध्ये 22 डिसेंबर ला होणार पहीले बाल साहीत्य संमेलन: बाल साहीत्य संमेलन घेणारी महाराष्ट्रातील पहीलीच जिल्हापरिषद:


विशेष आकर्षण: सुप्रसिध्द अलबत्या गलबत्या नाटकाचे होणार सादरीकरण:

सहीत्य सुंमेलनाच्या अध्यक्ष पदाचा मान मिळणार नववीत शिकणा—या 
साक्षी तिगाडे या मुलीला: 


रिपोर्टर: ग्रामीण भागातील विदयार्थ्यांच्या कला गुनांना वाव मिळावा यासाठी पहील्यांदाच उस्मानाबाद जिल्हापरिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने बालकुमार साहीत्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.ग्रामीण भागामध्ये जिल्हापरिषद शाळेसह खाजगी शाळेत शिक्षण घेण्या—या सर्वंच विदयार्थ्यांना यामध्ये सामावून घेण्यात आले आसल्याची माहीती जि,प,उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली.यावेळी जि,प,अध्यक्ष नेताजी पाटील शिक्षण अधिकारी रोहीणी कुंभार,उपशिक्षण अधिकारी शेख यांची उपस्थिती होती.

जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील आणि उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या संकल्पनेतुन महाराष्ट्रातील पहीले एकमेव बालकुमार साहीत्य संमेलन उस्मानाबाद येथे घेण्यात येणार आहे.या संमेलनाच्या माध्यमातुन जिल्हापरिषद शाळेत शिकणा—या ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना आपला साहीत्य अविष्कार दाखवण्यासाठी मोठी संधी मीळणार आहे.या संमेलनाची पुर्व तयारी म्हणुन तालुका स्तरावर नोव्हेबर 2018 मध्ये कथाकथन,काव्यवाचन,कव्वाली,पोवाडा,गायन एकपात्री नाटक,लोकनृत्य,हस्तलिखीत चित्रकला,इत्यादी स्पधा्र घेण्यात आल्या आहेत.या स्पर्धेतील स्पर्धक तसेच जिल्हाभरातील जिल्हापरिषदेच्या उच्च प्राथमिक शाळातील 5000 विदयार्थी तसेच शिक्षक या संमेलनामध्ये सामील होणार आहेत.या साहीत्या संमेलनामध्ये प्रथम,व्दितीय,आणि त्रतीय आशा पध्दतीने बक्षीस वितरण होणार आहे. तर या संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान  इयत्ता नववीत शिकणारी कु.साक्षी बालाजी तिगाडे हीला मीळाला आहे.
शाळांमध्ये वातावरण निर्मीती करण्यासाठी तालुकास्तरावर आठही तालुक्यातुन दिनांक 18 डिसेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीमध्ये कील्ल,एलिजाबेथ एकादशी,हिचकी,हे चित्रपट दाखवले जाणार आहेत.
संमेलणाच्या पुर्वी एक दिवस तालुका स्तरावर झालेलया स्पर्धाचे बक्षिस वितरण तसेच ग्रंथदिंडी काढण्यात येणार आसुन त्यामध्ये समाज प्रबोधनपर चित्ररत सहभागी होणार आहेत उत्कृष्ठ चित्ररथाला पारितोषिक देण्यात येणार आहे.

23 तारखेला होणार व्यवसायीक मार्गदर्शन शिबीर 
   विदयार्थ्यांनी परंपरेच्या शिक्षण पध्दतीवर आवलंबुन न रहाता व्यवसायीक शिक्षण पध्दतीचा आवलंब करूण परिस्थितीवर मात करण्याचे शिकले पाहीचे यासाठी व्यवसायीक तज्ञ यशपाल कदम ओरंगाबाद,भगवान पांडेकर पुणे,विजय सर्जेराव कचरे,यांचे व्यवसायीक मार्गदर्शन विदयार्थ्यांना मीळणार आहे.