पाडोळी महसूल मंडळांमध्ये समाधान शिबिराचे आयोजन:


रिपोर्टर:पाडोळी महसूल मंडळांमध्ये समाधान आज दी.२२-११-१८ रोजी महाराजस्व अभियान विस्तारीत समाधान योजनेचे शिबिर पाडोळी येथे पार पडले या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार राउत यांच्या हास्ते करण्यात आले.यावेळी प्रत्येक विभागातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते .या शिबिरामध्ये बोलताना तहसीलदार राऊत  म्हणाले की शासनाच्या योजना आपल्यापर्यंत आल्या आहेत त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा जे खरेच गरजवंत आहेत अशा गरजवंतांपर्यंत शासनाच्या योजना आम्ही त्यांच्या घरापर्यंत जाऊन पोचवू आणि लोकांच्या समस्याचे निवारन करू त्याच बरोबर या शिबिराचे आयोजक आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष सुधीर  पाटील यांचे देखील आभार मानले कार्यक्रमाच्या वेळी गावातील ज्येष्ठ नागरिकासह मोठया प्रमाणात लोकांची उपस्थिती होती.