संतयोगी साधुबुवा समाधी देवस्थानला पालखीरथ भेट देवदत्त मोरे फौंडेशनचा पुढाकारकळंब, रिपोर्टर:  दि. 14- कळंब तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळगाव (डोळा) येथून दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिकी एकादशीला तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे जाणार्‍या संतयोगी साधुबुवा यांच्या संजीवन समाधी देवस्थानला देवदत्त मोरे फौंडेशनच्यावतीने पालखीरथ देण्यात आला आहे. मंगळवारी हा पालखीरथ देवस्थानला सुपूर्द करण्यात आला.
दरवर्षी तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील पांडूरंगाच्या कार्तिकी एकादशीच्या यात्रेला उस्मानाबाद तालुक्यातील श्रीक्षेत्र तेरच्या संत गोरोबाकाकांची पालखी, कळंब तालुक्यातील पिंपळगाव येथील संतयोगी साधुबुवा यांची पालखी जाते. या पालखीसोबत शेकडो वारकरी पुरूष, महिला सहभागी होतात. पालखीरथाचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी यंदा देवदत्त मोरे फौंडेशनच्यावतीने देवस्थानला मोफत पालखीरथ बनवून देण्यात आला आहे. मंगळवार, 13 नोव्हेंबर रोजी फाऊंडेशनचे प्रतिनिधी प्रा. जगदीश गवळी यांनी रथाची विधीवत पूजा करुन देवस्थानचे अध्यक्ष नारायण दशवंत यांना पालखीरथ सुपूर्द केला. यावेळी गोपाळ उबाळे, राजाभाऊ पवार, ज्ञानेश्वर पतंगे, अविराज सुरवसे यांच्यासह अनेक पुरुष व महिला वारकरी उपस्थित होते.