संविधान दिनानिमित्त देवदत्त मोरे फाउंडेशनच्या वतीने पोलीस स्टेशनसह शाळा,विदयालयाला संविधान भेट:







रिपोर्टर: तालुक्यातील तडवळे येथील  देवदत्त मोरे फाउंडेशनच्या वतीने   संविधान दिनानिमित्त  तडवळे येथील जि प आदर्श केंद्रीय शाळा,जयहिंद विद्यालय ,आदर्श कन्या शाळा व ढोकी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  गणपत जाधव यांना भारताचे संविधान भेट दिले व तडवळे येथिल तिन्ही शाळेत उद्देश पत्रिकाचे वाचन करण्यात आले. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालयात भारताचे संविधानाची प्रत देण्यात आले  या उपक्रमाचे आयोजन देवदत्त मोरे फाउंडेशन व दलीत मित्र यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी दलित मित्र व देवदत्त मोरे फाऊंडेशन चे सद्स्य प्रशांत भालशंकर,मनोज पवार ,पद्मम चौगुले ,पत्रकार भागवत शिंदे, ,विकास उबाळे ,विजय पवार सह आदींची उपस्थिती होती