ढोकी महसूल मंडळांतील समाधान शिबिरामध्ये लोकांचा मोठया प्रमाणात प्रतिसाद:रिपोर्टर: संपुर्ण जिल्हाभरात राबवण्यात आलले समाधान शिबीर मंगळवारी ढोकी येथे आयोजीत करण्यात आले होते.लोकांच्या आडचनी आणि कागदोपत्री कामाच्या समस्या या शिबिराच्या माध्यमातुन सुटत आसल्यामुळे. या शिबिराला जिल्हाभरात मोठा प्रतीसाद मिळाला आहे त्याच प्रमाणे मंगळवारी ढोकी या ठिकाणी राबवण्यात आलेल्या शिबिराला ही लोकांनी मोठया प्रमाणामध्ये प्रतीसाद देवून समस्याचा निपटारा केला. 

ढोकी येथील महसूल मंडळांमध्ये महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबीर दिनांक 20 नोव्हेंबर 2018  रोजी आयोजित करण्यात आले होते . आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.सुधीर पाटील महाराष्ट्र शासन ,केंद्र शासन,तहसील कार्यालय उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण जिल्ह्यातील महसुल मंडळांमध्ये समाधान शिबीर राबविले जात आहे. शिबिराचे उद्घाटन प्रा. सुधीर पाटील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गुंड गुरुजी , भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस मा . सतीश देशमुख एस पी शुगर चे चेअरमन सुरेश पाटील,पंचायत समितीचे सदस्य संग्राम देशमुख ,दत्ता भाऊ सोनटक्के , गजानन नलावडे,  लोंढे भारत मंडळाधिकारी तीर्थकर  यांच्या हस्ते करण्यात आले .याप्रसंगी बोलताना समाधान शिबिराचे आयोजक प्रा. सुधीर पाटील यांनी सांगितले की, "नीतिमूल्य आयोगाच्या अहवालानुसार उस्मानाबाद जिल्हा हा देशातला तीन नंबरचा मागास जिल्हा म्हणून जाहीर झाला आहे . उस्मानाबाद जिल्ह्याचे मागासलेपण दूर व्हावे व जिल्ह्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढावे यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान योजना निर्माण केली आहे . जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून, यांची कागदपत्र गोळा करून आम्ही मुख्यमंत्र्यांना सोपवणार आहोत स्वतः मुख्यमंत्री यासाठी बैठक घेऊन लोकांना योजना मिळवून देणार आहेत .यास्तव लोकांनी समाधान शिबिरामध्ये आपली नावे नोंदवून लागणारी कागदपत्रे द्यावीत असे आवाहन केले ". सतीश  देशमुख यांनी "जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडळांमध्ये समाधान शिबीर आयोजित केल्याबद्दल नागरिकांच्या वतीने सुधीर अण्णांचे आभार मानले लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले " गुंड गुरुजी दत्ता भाऊ सोनटक्के व संग्राम देशमुख यांनीही आपल्या भाषणातून शिबिराला शुभेच्छा दिल्या शिबिर यशस्वी करण्यासाठी हरिभाऊ तिवारी, मानिक तात्या वाकोरे , प्रभाकर गाढवे, लालासाहेब शिंदे, पवन वाघमोडे ,तात्या गडकर, दादा डोलारे ,पंकज देशपांडे, संग्राम देशमुख (परीट ) , अमित कासार ,दत्ता चाबुकस्वार ,धनंजय गुरव ,लक्ष्मण सुपलकर ,अरुण कोकाटे, राजपाल दाणे, संजय तिवारी ,किशोर तिवारी, संतोष तिवारी, राजेंद्र वाकोरे, गणेश देठे, सुरज थोडसरे ,बालाजी गरड, अमर शिंदे, सुरज राउत, महादू तांबे यांनी परिश्रम घेतले यासोबतच आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे कर्मचारी यांनीही परिश्रम घेतले.