अभिमन्यू पतसंस्थेच्या सभासदांना दिवाळी भेट: दीड हजार सभासदांना साखर व खाद्यतेलाचे वाटप




रिपोर्टर: अभिमन्यू सहकारी पतसंस्थेच्यावतीने संस्थेच्या सभासदांना दिवाळी सणानिमित्त गतवर्षीप्रमाणे यंदाही मोफत साखर व खाद्यतेलाचे वाटप करण्यात आले.
पतसंस्थेचे अध्यक्ष तथा युवा उद्योजक देवदत्त मोरे यांनी कसबे तडवळे येथील लहान-मोठ्या व्यवसायिकांना व तरुणांसाठी नवीन व्यवसाय सुरू करण्यास हातभार लागावा या उदात्त हेतुने दोन वर्षांपूर्वी अभिमन्यु सहकारी पतसंस्था स्थापन केली. पतसंस्थेच्या माध्यमातून अनेकांनी आपले व्यवसाय सुरू केले आहेत. गतवर्षी दिवाळीनिमित्त साखर आणि खाद्यतेलाचे वाटप करण्यात आले होते. यंदाही मोरे यांनी संस्थेच्या दीड हजार सभासदांना प्रत्येकी पाच किलो साखर व तीन किलो खाद्यतेल वाटप करण्याचा निर्णय घेतला व वाटपाचा शुभारंभ शनिवारी मोरे यांच्या मातोश्री पार्वतीबाई मोरे व वडील भागवत मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी अभिमन्यू पतसंस्थेचे अध्यक्ष तथा उद्योजक देवदत्त मोरे, संचालक अर्चना मोरे, शहाजी वाघ, धनाजी होगले, भागवत शिंदे, विकास उबाळे, रणजित पाटील, सूरज शेख, जगन्नाथ विभुते यांच्यासह मुलगा आदेश मोरे, आदर्श मोरे, देविका मोरे यांच्यासह पतसंस्थेचे व्यवस्थापक एल. बी. चव्हाण, विजय पवार, अजीम शेख, मयुर धोंगडे, प्रकाश वारे आदी कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते