श्रीराम मंदिरच्या बांधकामाचा संकल्प करत हिंदु समाजाचा हुंकार आयोध्येत जाऊ द्या...दादा वेधक
उस्मानाबाद ...-राम हे आमच्या राष्ट्राची अस्मिता आहेत,देशाच्या सर्व भागात सर्व जनांत श्रीराम हे श्रेष्ठ दैवत आहेत,श्रीराम हे पारिवारिक सामाजिक राष्ट्राच्या जीवनात संभ्रमावस्था येताच श्रीरामांचे जीवन आम्हास प्रेरणा देऊन जाते असा हा दिव्य प्रेरणास्त्रोत आहेत.त्या आराध्यदैवताचे मंदिर बांधने हीच आपली आरपारची लढाई आहे असा हुंकार विश्व हिंदु परिषदेच्या हुंकार सभेत दादा वेधक यांनी भरला.
विश्व हिंदु परिषदेने आज धाराशिव शहरात लेडीज क्लब मैदानावर हुंकार सभेचे आयोजन केले त्यात केंद्रीय सत्संग प्रमुख दादा वेधक बोलत होते.
यावेळी अधिक बोलताना दादा वेधक म्हणाले की देश स्वतंत्र झाला तत्पूर्वी देशात मोठ्याप्रमानात हिंदु श्रद्धास्थानांवर घाला घालण्यात आला होता त्या श्रद्धांस्थानांचे वैभव पुन्हाप्राप्त होईल अशी आशा हिंदु समाजास होती पण ती पुर्ण झाली नाही.त्या श्रद्धांस्थानांमधे प्रमुख  राममंदिर हे एक आहे ज्याला उध्वस्त करताना आक्रमक बाबरच्या सेनापती मिरबाकीने साढ़ेतीन लाख हिंदुंची हत्या केली,तेंव्हा पासुन राममन्दिराच्या निर्मानाचा लढा चालु आहे,या लढ्यात साधु सन्यासी,धर्माचार्यानी सहभाग घेतला आहे.त्यासाठी श्रीरामभुमी मुक्ती न्यासची स्थापना करण्यात आली.तेंव्हा पासुन हा लढा चालु आहे.एक महासंघर्ष उभा केला त्यात झालेल्या संघर्षात अनेकांचे बलिदान झाले.पुढे न्यायालयाने बाजु समजुन श्रीराम जन्मभुमिचे कुलुप काढण्याचे आदेश दिले हा पहिला विजय या आंदोलनाला मिळाला.देशातील गावागावातुन कारसेवकानी श्रीराम जन्मभुमी मुक्ती साठी आत्मबलिदान दिले तेंव्हा हा लढा उभा राहिला,हा लढा आजचा नाही तर अनेक पिढ्यानी केलेल्या त्यागाचा हा जाज्वल्य इतिहास आहे.हा इतिहास बलिदानाचा आहे हे बलिदान शेकडो वर्ष लागलेला कलंक मिटवन्यासाठी झाले,कलंक मिटवला विवादित जागेवर तात्पुरते मंदिर बांधले.या जागेवर सुंदर भव्य मंदिर पुन्हा बांधने ही आरपारची लढाई आपन लढुया.

या विवादित बाबरी मस्जिदच्या जागेत पुर्वी भव्य श्रीराममंदिर होते हे उत्खनन करताना सिद्ध झाले.सर्व पुरावे कोरिव पुरातन दगडी खांब मिळुन आले पण शेकडो पुरावे मिळुनही श्रीराम मंदिर बांधकामास प्रारंभ होऊ शकला नाही.न्यायालय याचा सन्मानजनक निर्णय करु शकले नाही, म्हनुन आता आपन एकजुटीने हे मंदिर बांधकाम पुर्ण करुया असा दुर्दम्य हुंकार त्यानी उपस्थितांसमोर भरला.
न्यायालयास कोट्यावधी हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा न्यायनिवाडा करन्यास वेळ नाही पण समलैंगिक विवाह,लिव्ह इन रिलेशन शिप असल्या बाष्कळ खटल्यांसाठी तात्काळ वेळ दिला जातो.न्यायाल्यावर आमचा विश्वास आहे पण दुर्दैवाने कार्यपद्धतीवर विश्वास उरला नसल्याचे त्यानी सांगितले.
या हुंकार सभेचे प्रास्ताविक ह.भ.प.बाबुराव पुजारी यानी केले आपल्या प्रास्ताविकात त्यांनी राम मंदिर ही राजकीय चळवळीचा भाग नाही तर हा लढा गेली पाचशे वर्ष अव्याहत चालु असल्याचे व विश्व हिंदु परिषद हा लढा लढत असल्याचे सांगितले.
या सभेला आशीर्वचन म्हणुन पांचाळ महाराज,आकाशदादा महाराज मगर यानी मार्गदर्शन केले.
विश्व हिंदु परिषदेच्या हुंकार सभेस विश्व हिंदु परिषदीचे केंद्रीय सत्संग प्रमुख़ प्रमुख दादा वेधक या जिल्हा संघचालक अनिल यादव,जिल्हाध्यक्ष दत्तात्रय चौरे, बाबुराव पुजारी,धर्माचार्य पांचाल गुरूजी,धर्माचार्य गोरक्षा प्रमुख आकाशदादा महाराज,श्रीकृष्ण धर्माधिकारी,बजरंग दल जिल्हा संयोजक विक्रम साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रभु श्रीरामांच्या प्रतिमांचे व छत्रपती शिवाजी महाराज युवराज संभाजीराजे यांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात आले,मान्यवरांच्या हस्ते दिप्रज्वलन करून हुंकार सभेला सुरुवात करण्यात आली.
सुत्रसंचलन परमेश्वर शिंदे यांनी केले.
आभार विक्रम साळुंके यांनी मानले
पसायदानाने सभेची सांगता झाली.