जि. प.केंद्रीय प्रशाला तडवळा येथे विस्तारधिकारी किशोरी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली रहेमान सय्यद यांचा सत्कार करूण निरोप समारंभ घेण्यात आला. या वेळी सय्यद यांच्या कार्याबद्दल .जानराव
शिक्षक देवशेटवार , टोणे ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य बालाजी जाधव ,प्रस्ताविकातून चौधरी व अध्यक्षीय भाषणात जोशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.सय्यद सरांची दोन वर्षांची यशस्वी कारकीर्द या बद्दल आपले मत व्यक्त केले. सय्यद यांचा भव्य असा सत्कार करताना निरोप व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या .त्यानंतर येडशी येथील प्रश्नमंजुषा बक्षीस वितरण, एम, टी, एस, मंथन ,नवोदय ,शिष्यवृत्ती ,डॉ, होमी भाभा स्पर्धा याचे भरगच्च असे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अध्यक्ष धनाजी गडकर ,अध्यक्ष भागवत शिंदे ,थोडसरे दादा ,बालाजी जाधव ,मनोज पाटील ,अंकुश पवार ,महादेव जाधव गुरुजी ,चंद्रकांत मोदी ,प्रदीप नाईकनवरे हे उपस्थित होते. त्यानंतर महादेव जाधव गुरुजी व बदली होऊन गेलेल्या शिक्षकामार्फत कपाट कोंडाप्पा कोरे यांच्या उपस्थितत शाळेला भेट देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक ,शिक्षिकांनी प्रयत्न केले.कार्यक्रम सुत्रसंचलन बाळासाहेब जमाले यांनी तर आभार बापू लोंढे यांनी मानले.....