सुधीर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उस्मानाबाद येथे समाधान शिबिराचे आयोजन:रिपोर्टर:  आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य माननीय सुधीर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त  उस्मानाबाद येथे समाधान शिबिराचे आयोजन        करण्यात आले हाते.:
उस्मानाबाद येथील श्रीपतराव भोसले हायस्कूल च्या प्रांगणामध्ये  महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.नितीमूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार उस्मानाबाद जिल्हा हा देशातला तीन नंबरचा मागास जिल्हा म्हणून घोषित झाला आहे . उस्मानाबाद जिल्ह्याचे मागासलेपण दूर व्हावे व उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतील समाधान योजना सुधीर पाटील यांच्या पुढाकारातून संपूर्ण जिल्ह्यातील महसूल मंडळांमध्ये राबवली जात आहे .आज सुधीर पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उस्मानाबाद शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये शिबिराचे  आयोजन करण्यात आले होते . शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस .सतीश देशमुख सरचिटणीस प्रभाकर मुळे औसा तालुका भाजपा अध्यक्ष दत्ता सोनटक्के जिल्हा परिषद सदस्य ज्ञानदेव राजगुरू व युवा नेते अभिराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .याप्रसंगी बोलताना सतीश  देशमुख यांनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन नागरिकांना केले .प्रभाकर मुळे यांनी हे शिबिर आयोजित केल्याबद्दल सुधीर आण्णांचे आभार मानले .अभिराम पाटील यांनी  योजना लोकांना मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले .याप्रसंगी महानगरपालिकेच्या नगरसेविका सौ.प्रेमाताई पाटील उस्मानाबादचे मंडळाधिकारी देशपांडे,तलाठी खोत यांचीही उपस्थिती होती हे शिबिर यशस्वी करण्यासाठी ह ब प प्रकाश जाधव महाराज , खालेद भाई  शेख ,प्रमोद कदम, राम मुंडे, श्रीराम मुंबरे ,सुरज तांबे ,मनोज देशमुख, ऋषी पाटील यांनी परिश्रम घेतले .