जळकोट महसूल मंडळातील नागरीकांनी घेतला विस्तारित समाधान योजनेचा लाभ.

                           
रिपोर्टर: जळकोट येथील जी.प. प्रशालेमध्ये दि : 14 नोहेंबर रोजी महाराजस्व अभियानाअंतर्गत 'समाधान शिबिर 'राबवण्यात आले . आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ व केंद्र शासन,महाराष्ट्र शासन व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे विस्तारीत समाधान शिबीर राबवले जात आहे . जळकोटसह महसूल मंडळातील मूर्टा , होर्टी , नंदगाव , सिंदगाव व परिसरातील अनेक गावातील नागरिक या शिबिरामध्ये सहभागी झाले होते .शिबिराचे उद्घाटन सत्यवान भाऊ सुरवसे यांनी  फित कापून केले  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस त्यांच्या संकल्पनेतील समाधान योजना महाराष्ट्रात सर्वप्रथम  उस्मानाबाद जिल्हया मध्ये राबविण्यात येत आहे .ज्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळालेला नाही अशा लोकांनी याचा लाभ घ्यावा .आम्ही जातीने पाठपुरावा करून वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्याना मिळवून देणार असल्याचे व महाराष्ट्रात समाधाना योजना पहिल्यांदा आपल्या राबवली जात आहे. त्यामुळे भाजपाचे तालुका प्रमुख सत्यवान भाऊ सुरवसे यांनी सुधीर पाटील यांचे आभार मानले.  शासनाचे सर्व विभाग या शिबिरामध्ये सहभागी झाले होते. याप्रसंगी कृषी विभागाच्या वतीने जागेवरच कांदाचाळ पूर्व संमती पत्र वाटप करण्यात आले . तसेच मागेल त्याला शेततळे ,कृषी यांत्रिकीकरण भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून सिताराम गायकवाड यांना फळबाग लागवडीचे अनुदानपत्र देण्यात आले तसेच संमती पत्र वाटप बियाणे , परमिट वाटप रोजगार हमीतून गांडूळ शेड ,नापेड शेड , बांधकाम बद्दल सूक्ष्म सिंचन , तुषार ठिबक याची माहिती देण्यात आली. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी  दत्ताभाऊ राजमाने , कस्तुराबाई कारबारी ,भीमाशंकर हासुरे , अर्जुन कदम , लोहगाव चे सरपंच सौ .दबडे ,लोहगाव गावचे उप सरपंच  प्रशांत देशमुख , महेश पाटील ,बालाजी दबडे ,सौदागर दबडे, सोमनाथ स्वामी , प्रवीण काटकर ,तुकाराम हासुरे ,बालाजी पाटील , डॉ .सात्विक शहा ,मल्लिनाथ गुड्डे , प्रवीण चौगुले , मेघराज किलजे , शिवराम पांचाळ ,दत्ता मोरे नांदगाव ते धोंडीराम पांचाळ अनिल कट्टी नागेश चींनगुंडे यांनी परिश्रम घेतले