उदयोजक देवदत्त मोरे यांच्या वतीने पहेलवान मनोज माने यांचा चांदीची गदा देऊन सन्मान: लोकसभेच्या धरतीवर भेटी गाटी:




रिपोर्टर:  लोकसभेचा आखाडा गाजवण्यासाठी इच्छूक असलेले दानशूर व्यक्तीमत्व देवदत्त मोरे यांनी शनिवारी बार्शी तालुक्यातील दहा गावांना भेट देवून आगळगाव येथील प्रसिद्ध  सुंदिवली सादिकअली पीरसाहेब यांच्या उरसानिमीत्त आयोजित कुस्तीच्या फडातील प्रथम विजेता मल्ल मनोज माने यांचा मोरे यांच्या हस्ते 51 हजार रुपये रोख, अडीच किलोची चांदीची गदा व अभिमन्यू केसरी किताब देवून सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मोरे यांनी आगळगावात भव्य शिवस्मारक उभारण्याची घोषणा केली. 
कसबे तडवळे येथील प्रसिद्ध उद्योजक देवदत्त मोरे यांनी गेली सहा वर्षांपासून जिल्ह्यातील विविध भागात सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक कार्याला मोठा हातभार लावलेला आहे. या कार्याच्या आधारावर त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याचा पक्का निर्धार केला आहे. त्यासाठी देवदत्त मोरे फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्याचा वेग वाढवून संपर्कावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी उद्योजक देवदत्त मोरे यांनी बार्शी तालुक्यातील दहा गावांना भेट दिली. त्यात कुसळंब व उपळाई (ठोंगे) येथील दत्त मंदिराला भेट देवून ग्रामस्थासोबत गावच्या अडीअडचणी व विकासकामावर   चर्चा केली. त्यानंतर त्यांनी खडकोणी या तंटामुक्त आणि गटारमुक्त गावाला भेट देवून विकास कामासाठी गावाला सढळ हाताने मदत करण्याचे आश्वासन दिले. उंबरगे येथील मलीक बाबा दर्ग्याला भेट दिल्यानंतर सरपंच दादा विधाते यांनी देवदत्त मोरे यांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार केला. गाडेगाव, देवगाव, भानसाळे या गावांना भेटी दिल्यानंतर सायंकाळी नऊ वाजता आगळगाव येथील सुंदीवली सादिकअली यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित कुस्तीच्या फडातील प्रथम विजेता मल्ल मनोज माने यांचा देवदत्त मोरे फाऊंडेशनच्या वतीने उद्योजक देवदत्त यांच्या हस्ते रोख 51 हजार रुपये, अडीच किलोची चांदीची गदा व अभिमन्यू केसरी किताब देवून गौरव करण्यात आला.
यावेळी आगळगावचे सरपंच फिरोज मुजावर, खडकोणीचे सरपंच सचिन नलवडे, जिल्हा परिषद सदस्य किरण मोरे, रोहीत डमरे, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश डमरे, बबन गायकवाड, तडवळ्याचे माजी उपसरपंच नाना वाघ, आदेश मोरे, दत्तात्रय जगताप, पदम चौगुले, धनाजी होगले, सुरजपाशा शेख, राजेंद्र पवार, प्रा. गवळी यांच्यासह आगळगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.