डोमगाव येथे मेघराज दुधसंकलन व शितकरण केंद्राची सुरवात: बेरोजगारांना मिळणार रोजगार:


रिपोर्टर: कल्याणसागर उद्योग समुह प्रणित मेघराज दुधसंकलन व शितकरण  केंद्राची सुरवात दि. ८ नोव्हेबर रोजी दिपावली पाडव्याच्या मुहुर्तावर चिंचगाव टेकडीचे महाराज प.पु. रामानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते पुजन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार सुजितसिंहजी ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थीती होती.
             दुधसंकलन उद्योगाच्या माध्यमातुन तालुक्यातील अनेक होतकरू बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवुन देणारे ग्रामीण भागातील हनुमंत विठ्ठलराव पाटील यांनी आमदार सुजितसिंहजी ठाकूर व तुळजापुर तालुक्यातील बाभळगाव संचलीत वैष्णोदेवी मिल्क प्रोडॉक्ट यांच्या सहकार्याने एक लाख लीटर दुध शितकरण केंद्र उभे करून अल्पावधीतच तालुक्यातील दुग्धउद्योग क्षेत्रात जिद्द, मेहनत व चिकाटीच्या बळावर आपली वेगळी ओळख निर्माण करत यशाचे शिखर गाठले आहे.
       मागास म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या परंडा तालुक्यात डोमगाव या ग्रामीण भागात वास्तव्यास असणारे पाटील लहानपनीच वडीलांचे छत्र हरपल्यामुळे डोमगाव येथील त्यांचे मामा मनोहर मिस्कीन यांनी त्यांना आश्रय दिला. त्यांच्या पालनपोषन व शिक्षणाची त्यांनी जाणीवपुर्वक काळजी घेतली. शिक्षण घेत असतानाच मामांच्या राजकीय क्षेत्राच्या माध्यमातुन आमदार ठाकूर यांच्याशी पाटील यांचा संपर्क झाला. या संपर्कामुळे आ. ठाकूर अध्यक्ष असलेल्या  कल्याणसागर को- ऑप बँकेत त्यांना काम मिळाले. या नौकरीच्या माध्यमातुन बँकेचे कर्ज घेऊन पाटील यांनी ट्रॅक्टर घेतला. ट्रॅक्टरचा धंदा करत त्यांनी स्वतःच्या उद्योगाची सुरवात केली. यानंतर आ. ठाकूर यांची भेट घेऊन दुधसंकलन केंद्र सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली, यावेळी आ. ठाकूर यांनी मोठे धैर्य देत सहकार्याची ग्वाही दिली. या सहकार्याच्या बळावर पाटील यांनी मेघराज दुधसंकलन केंद्रची ई.स. २००५ ला सुरवात करुन दुधाच्या औद्योगीक क्षेत्रात मुहुर्तमेढ रोवली. यामध्ये त्यांना सुदैवाने मोठी साथ मिळाली व त्यांच्या नशीबाने मोठी कलाटणी घेत त्यांचे आर्थीक जिवनच बदलुन टाकले. यामध्ये त्यांना आई, बहीण व पत्नीचेही मोठे सहकार्य भेटले.
          दुधसंकलन केंद्रामध्ये हजारो लीटर संकलीत दुधाची रोजच्या रोज मोठ्या प्रमाणात मोठ्या शहराकडे टँकरमधुन रवानगी होऊ लागली परंतु नियमीत वेळेत उशीर झाला तर दुध खराब होण्याची शंका आल्यामुळे स्वतः दुधशितकरण केंद्र उभे करण्याचे नियोजन त्यांच्या मनात आले. त्यानुसार या उद्योगास जागेच्या खरेदीसह एक लाख लीटर क्षमतेच्या दुध शितकरण केंद्रास तुळजापुर तालुक्यातील बाभळगाव येथील संचलीत वैष्णोदेवी फुड प्रोडॉक्टच्या मदतीने मोठ्या प्रमाणात अर्थीक गुंतवणुक करुन परंडा तालुक्यासह त्यांनी करमाळा तालुक्यातीलही बहुतांश गावातील दुधसंकलन करणाऱ्यांची समस्या सोडवली. त्यांना कल्याणसागर को- ऑप बँकेने यासाठी अर्थसहाय्य केले. त्यांनी बँकेतील नौकरी करत करत दुधसंकलनाच्या माध्यमातुन कमावलेला पैसा इतरत्र खर्च न करता आपल्या दुध उद्योगास चालना देणारा व शेती पुरक दुग्ध व्यवसायासाठी अवश्यक असणाऱ्या पन्नास म्हैस एकदाच खरेदी करून दैनंदीन आर्थीक उत्पन्नात वाढ केली. म्हशीच्या दुधाची दुधसंकलन केंद्रात मोठ्या प्रमाणात विक्री होऊ लागली. गर्दी होत असल्याने त्यांच्याकडे शहरामधील मोठ्या व्यवसायीकांची मागणी होत असल्याने ते मागणी प्रमाणे शहरातही दुध पुरवठा करू लागले. यामध्ये अधिक पैसा मिळत असल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांनी पुन्हा म्हशींच्या दुधाचे प्रमाण वाढवले.
           यानंतर पाटील यांनी दुधापासुन उत्पादीत होणाऱ्या वस्तुंच्या निर्मितीस आपला मोर्चा वळवला असल्याचे दिसुन येते. यासाठी वैष्णोदेवी फुड प्रोडक्ट, बाभळगाव संचलीत कंपनी मार्फत दुधापासुन तयार होणाऱ्या पनीर सारख्या वस्तुंची निर्मीती करण्याचे काम सुरू होणार आहे. यामुळे शहर व तालुक्यातील नागरीकांना या वस्तु ताज्या व योग्य दरात मिळणार आहेत यामुळे तालुक्यातील सर्व स्तरामधील नागरिकांमधुन हनुमंत पाटील यांचे कौतुक होत आहे.