मुरूम येथे विस्तारित समाधान योजनेच्या शिबिरास नागरिकातून प्रतिसाद:


 रिपोर्टर:  मुरूम येथे महाराजस्व अभियान अंतर्गत घेण्यात येत असलेल्या महसूल मंडळ निहाय शिबिराचा तिसरा दिवस मुरूम महसूल मंडळातील नागरिकांनी या शिबिरामध्ये आपली गाऱ्हाणी घेऊन  सहभाग घेतला आणेकानचे प्रश्न जागेवर सोडण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला .
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय सुधीर पाटील यांच्या अथक प्रयत्नातून व महाराष्ट्र शासन व महसूल मंडळातील सर्व कर्मचारी  यांच्या संयुक्त विद्यमाने विस्तारित समाधान योजना राबविली जात आहे शिबिराचे उद्घाटन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय सुधीर  पाटील व राजू उर्फ श्रीकांत मिनियार नायब तहसीलदार विलास सारंगे यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरांमध्ये शासनाच्या 11 कार्यालयाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित आहेत. शिबिर यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय कैलास शिंदे भाजपा शहराध्यक्ष दिलीप इंगोले शिवशंकर भ्याले, जाकिर जमादार, सिद्राम सोनटक्के, दिलीप नालावडे ,राम डोंगरे,युवा नेते अभिराम पाटील, श्रीराम  मुंबरे तसेच आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व कर्मचारी यांनी कष्ट घेतले