रिपोर्टर: १९ नोव्हेंबर हा दिवस देशभरात जागतिक शौचालय दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.यानिमित्त केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने देशात स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी स्पर्धा घोषित करण्यात आली आहे. ’स्वच्छ भारत जागतिक शौचालय दिन स्पर्धा २०१८’ असे या स्पेर्धेचे नाव असुन या स्पर्धेत जिल्हायातील सर्व ग्रामपंचायतीं सहभागी होणार आहेत अशी माहिती जिल्हा् परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय केालते यांनी दिली आहे.
या स्पयर्धेचा कालावधी ०९ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर,२०१८ असा दहा दिवसांचा आहे या दहा दिवस चालणा-या या स्पयर्धेत जिल्हायात राबविण्याात येणा-या स्वच्छता विषयक उपक्रमांचा दर्जा आणि तीव्रता या मुदयावर ही स्पअर्धा आधारित आहे.या स्पेर्धेत स्वच्छतेसाठी ग्रामीण भागातील कुटुंबांच्या- गृहभेटी,स्वच्छाता कार्यक्रमात लोकसहभाग,गावस्तारावर हागणदारीमुक्तीयचे बोर्ड लावणे,दोन खडयाचे शौचालयाची माहिती ग्रामपंचायतींच्या दर्शनीय ठिकाणी लावणे,नमुना शौचालय उभे करणे,चित्रफलक प्रदर्शित करणे.शौचालयाच्या एक खडयाचे दोन खडयात रुपांतर करणे,सोनखत निर्मितीसाठी जनजागृती,गोबरधन बायोगॅस युनिट,पायाभुत सर्व्हेकक्षणातुन सुटलेले कुटुंबांचे शौचालय बांधकाम, स्वच्छता रॅली व परिसर स्वच्छता, ग्रामपंचायत व तालुकास्तरावर स्वच्छतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या/करणा-या सरपंच,स्वच्छासग्रहीं व व्यक्तींचा सन्मान करणे, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन उपक्रम, समग्र स्वच्छता व ग्रामपंचायत स्तरावर गुणवत्ता व शाश्वॅत स्वच्छता विषयक नाविण्यरपुर्ण उपक्रम आदी उपक्रम सरपंच,ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी व गट विकास अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाभरातील प्रत्ये क गावात राबविण्यात येणार आहेत.तसेच राबविलेल्या उपक्रमांचे छायाचित्र,व्हिडीओ आणि इतर माहिती केंद्र शासनाच्या sbm.gov.in/wtd2018 या वेबपोर्टलवर ग्रामसेवक,ग्राविकास अधिकारी व गट विकास अधिकारी यांनी अपलोड करावी असे आवाहन मुख्य् कार्यकारी अधिकारी डॉ.संजय केालते यांनी केले आहे.
या स्पर्धेत देशातुन सर्वोत्कृष्ट दहा जिल्हयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तीन राज्या चे सचिव व अभियान संचालक यांना केंद्र शासनाच्या वतीने सन्मावनित करण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे स्वच्छ भारत मिशन चे विशेषदुत सिने अभिनेते अक्षय कुमार यांच्या आगामी चित्रपटाच्यास शुटींगमध्येय सहभागी होऊन अक्षय कुमार यांच्याशी संवाद साधण्या्ची संधी मिळणार असल्या चे केंद्र सरकार कडुन कळविण्याात आले आहे.या संधीचा फायदा घेण्यासाठी जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींनी ’स्वीच्छ भारत जागतिक शौचालय दिन स्पर्धा २०१८’ या स्पर्धेत सहभागी होऊन कल्पक उपक्रमांचे आयोजन करावे व आयोजित उपक्रमांचे छायाचित्र,व्हिडीओ आणि इतर माहिती केंद्र शासनाच्या sbm.gov.in/wtd2018 या वेबपोर्टलवर अपलोड करावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय केालते यांनी केले आहे.