नवरात्री च्या धरतीवर भक्ताच्या स्वगतासाठी तुळजापुर नगरी सज्ज:जिल्हाधिकारी गमे


तुळजापुर यात्रा आनुदानाचा कायमस्वरूपी बाबीवर होणार खर्च: 

 रिपोर्टर:एक दिवसावर येवून ठेपलेल्या नवरात्री मोहोत्सवाची पुर्णपणे तयारी झाली आसुन आरोग्य सेवा,बदोबस्त,आणि इतर सर्व बाबीचा आढावा घेण्यात आला आल्याची माहीती आयोजित पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्याकडुन देण्यात आली त्याच बरोबर यावर्षीच्या यात्रा आनुदानाचा निधी कायम स्वरूपी बाबीवरच होणार आसल्याची माहीतीही जिल्हाधिका—यांनी यावेळी दिली.   


उदयापासुन सुरू होण्या—या नवरात्री मोहत्सवानिमीत्त तुळजापुर शहरातील सर्व बाबीचा चोक आढावा घेवुन भावीकांसाठी तुळजापुर नगरी सज्ज झाली आसुन येणा—या भावीकासाठी विविध प्रकारच्या सुविधा देण्यात येणार आसल्याची माहीती जिल्हाधिका—यांनी दिली.यामध्ये वाढत्या साथीच्या रोगावर प्रतिबंध लावण्यासाठी मोठया प्रमाणात आरोग्या विभागातील डॉक्टरची टीम या ठीकाणी रहाणार आहे.त्याच बरोबर स्वईन फल्यूव सारखा जिवघेण्या रोगापासुन यात्रेकरूचे संरक्षण व्हावे यासाठी लागणारी सर्व उपकरणे या ठीकाणी ठेवण्यात आलेली आहेत.

यावर्षी सोलपुर रोड फक्त दोन दिवस रहाणार बंद:

प्रतेकवर्षी नवरात्रीच्या सुरवातीपासुन सोलापुर रोड पुर्णपणे बंद आसल्याने वहानधारकांना आडचनीचा सामना करावा लागत आसे.परंतु यावर्षी सोलापुर रोड हा फोर लाईन झाला आल्याने चालत येणा—या भावीकांना आडचन येणार नसल्याने यावर्षी यात्राच्या काळात  पोर्णीमाच्या दरम्यान फक्त दोन दिवस हा रोड बंद ठेवण्यात येणार आहे.आणि दररोज फक्त जड वहानांना बंदी आसणार आहे. बाकी चार चाकी वहाने नियमीत चालु रहातील.

पुजा—यांसाठी ओळखपत्र सक्तीचे:

तुळजाभवानी मंदीरातील जे नियमीत पुजारी आहेत त्यांना ओळखपत्र सक्तीचे करण्यात आले आहे.या ओळखपत्राचा कालावधी ​तीन महीण्याचा आसेल.ओळखपत्रा शिवाय मंदीरामध्ये कोणत्याही पुजा—या ला येवू दिले जाणार नाही.