
विकास उबाळे
उस्मानाबाद तालुक्यातील क तडवळे येथे भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखा उस्मानाबाद यांच्या वतीने आदर्श व गुणवंत विद्यार्थ्यांचा" स्टुडेन्ट ऑफ दि इयर " म्हणून सन्मान करण्यात आला
आयुर्विमा महामंडळ उस्मानाबाद यांच्या तर्फे क तडवळे येथील आदर्श आणी गुणवंत विद्यार्थ्यांना एस. पी.शुगर चे संस्थापक चेअरमन सुरेशबापू पाटील,दयानंद पाटील असिस्टंट मॅनेजर एल.आय. सी. उस्मानाबाद ,अजय शिलवंत, विकास अधिकारी एल.आय सी.उस्मानाबाद ,व्यापारी राजाभाऊ लोंढे ,प्राचार्य एम एम जाधव यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या वेळी जिल्हा परिषदआदर्श प्राथमिक शाळा ,जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा ,जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा,जयहिंद विद्यालय कसबे तडवळे येथील दहा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कुमारी वाघमारे संध्यारानी बाळासाहेब ,कु आवटे गायत्री मन्मथ ,कु क्षीरसागर राजनंदिनी राजेंद्र ,पवार श्रीप्रसाद संतोष ,पाटील मानस मनोज ,निंबाळकर पृथ्वीराज अण्णासाहेब,चव्हाण श्रेया दिनकर ,पाटील मनाली मिलिंद ,करंजकर धनश्री रमेश ,खान अमन फरीद यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आदर्श शिक्षक जगन्नाथ धायगुडे ,दयानंद पाटील सुरेश पाटील ,एम, एम,जाधव यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गावांतील आदर्श शिक्षक श्री बाळासाहेब जमाले यांनी केले,सूत्रसंचालन श्री ठाकरे सर यांनी केले, आभार अजय शिलवंत यांनी मानले.कार्यक्रमाचे आयोजन विमा प्रतिनिधी नानासाहेब जमाले यांनी एल.आय. सी. कार्यालयामार्फत केले होते या कार्यक्रमास उपस्थित धनाजी गडकर, बालाजी जाधव,रौफ कोरबु ,सतीश करंजकर , बाळासाहेब वाघमारे,बापू लोंढे ,शहाजी पुरी,व्यकंटी देवशेटवार ,घोडके उपस्थित होते त्याच बरोबर शिक्षण प्रेमी नागरिक ,या कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले एल आय सी उस्मानाबाद यांनी असा उपक्रम राबविल्यामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढते यामुळे नागरिकांतून कौतुक होत आहे