दुष्कळाने होरपळणार्या शेतक—याला महावितरणच्या शाँर्ट सर्किट ने बरबाद:


रिपोर्टर: उस्मानाबाद तालुक्यातील वानेवाडी येथिल शेतक—यांचा महावितरणच्या शॉट सर्कीट ने चार एक्कर तोडनीला आलेला उस जळून खाक झाला आहे.यात या शेतक—यांचे लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे.

वाणेवाडी येथील शेतकरी रमेश उतरेश्र्वर घेवारे यांची हिंगळजवाडी शिवारात जमीन असून त्यानी दुष्काळातही मोठ्या कष्टाने चार एकर ऊस चांगल्या प्रकारे जोपासला होता. परंतु सोमवार दि.29 आँक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास शेतात असलेल्या महावितरण च्या डी.पी.वरील डी.ओ. वर शाँर्ट सर्किट होऊन त्यांच्या ठिणग्या उसावर पडल्या उसाचे पाचट वाळलेले असल्याने ऊसाने तात्काळ पेट घेतला त्यात तोडणीला आलेल्या उसाचे ला खो रुपयांचे नुकसान झाले
आधीच दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांना महावितरणच्या शाँर्ट सर्किटच्या झटक्यात पुरता च होरपळून गेला आहे कांहीं दिवसात तुटणाऱ्या उसाला अर्धवट जळालेल्या अवस्थेत कमी भावाने ऊस कारखान्याला घालावा लागणार आहे ....