तेर कोळेवाडी रस्ता झाकुन गेला वेडया बाबळीने:
तेर रिपोर्टर: 

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर कोळेवाडी रोडवर वेडया बाबळीचे साम्राज्य आसल्याने या गावाला जाणारा रस्ता शेतक—यांसह येणरा जाणारांना आवघडीचा ठरला आहे.


तेर परिसरातील बारा वाड्यापैकी एक असणाऱ्या कोठेवाडी रोडवर पर्ण वेडया बाबळीचे साम्राज्य आसल्याने रोडवरून जात आसताना एका हातात बाबळीची फांदी आणि दुस—या हाताने मार्ग काढण्याचे काम करावे लागत आसल्यामुळे लोकांना चांगलीच कसरत करून हा रस्ता पार करावा लागत आहे. या वाडीला जाणारा अवघा तीन कि.मी.लांबीचा रस्ता झाडे झुडपात हरवला आहे दोन्ही बाजूंनी मोठ मोठे झुडपे रस्त्यावर वाढली आहेत त्यामुळे वाटसरूंना काट्यात रस्ता शोधावा लागत मोठी वहाणानं या रस्त्यावरून जाता येत नसल्याने  आठ किलोमीटर चा वळसा घालून वाडीला जावे लागत आहे त्यामुळे या रस्त्यावरील झुडपे तोडण्याची मागणी या परिसरातुन होत आहे.