विज बिलासाठी ढोकी सह चार गावाची बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजनेला शासनाकडुन मान्यता:

 ​

रिपोर्टर: उस्मानाबाद तालुक्यातील तेर,ढोकी,तडवळा,येडशी,या चार गावाला पाणी पुरवठा करणारी योजना गेली तिन वर्षापासुन विज बिल आणि आन्य कारणामुळे बंद आवस्थेत होती. ही योजना सुरू व्हावी म्हणून या कामाच्या निधी बाबत जिल्हापरिषदेच्या वतीने शासनाकडे वेळोवेळी मागणी केली जात होती.याची दखल घेवुन शासनाने या योजनेस हीरवा खंदील दाखवला आसल्याची माहीती आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये जिल्हापरिषदेच्या उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी दिली. यावेळी जिल्हापरिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांची उपस्थिती होती.

उस्मानाबाद तालुक्यातील ढोकीसह चार गावांना तेरणा मध्यम प्रकल्पातुन 2006 मध्ये चार गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबवण्यात आली होती. 16 कोटी रूपये खर्च करूण राबवण्यात आलेली ही योजना तेर,ढोकी,तडवळा आणि येडशी या चार गावांना पाणी पुरवठा करत होती. मात्र 2015 साली धरणातील पाणी पुर्णपणे संपल्याने ही योजना काही काळ बंद राहीली त्या दरम्यान वाढत गेलेल्या विज बिलाचा आकडा मोठा झाला आणि ही योजना बंद राहीली.परंतु जिल्हापरीषदेच्या प्रयत्नामुळे विविध शासकीय योजनेच्या माध्यमातुन ही योजना पुन्हा सुरू करण्यास परवानगी मीळाली आहे.
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत बंद असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना नव्याने सुरू करण्यासाठी शासनाच्या वतीने माहीती मागवण्यात आली हाती.या माध्यमातुन जिल्हापरिषदेच्या महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभाग यांनी ही योजना सुरू करण्यासाठी 1 कोटी 91 लाख रूपये निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता.या अनुशंघाने ही योजना सुरू करण्यासा शासनाने परवानगी दिली आहे.यामुळे चार गावातील जनतेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.