कुपोषणा चे प्रमाण कमी करण्यासाठी दक्षता घेण्याची गरज: - आर्चनाताई पाटील
 रिपोर्टर: एकात्मीक बाल विकास विभागाच्याच्या माध्यमातुन लहान मुलांना कुपोषीत होण्यापासुन वाचवण्यासाठी उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे पोषण अभियान कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाला जिल्हापरेषदेच्या उपाध्यक्षा आर्चनाताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पोषण अभियानाच्या माध्यमातुन कुपोषणा बाबत जनजागृती आणि या विषयीची माहीती या कार्यक्रमातुन सर्वस्थरावर पोचवण्याचे काम जिल्हापरिषदेच्या माध्यमातुन होत आहे. तरी शहरी भागासह ग्रामीण भागातील जनतेने या कडे लक्ष देवून लहान मुलांना कुपोषणा पासुन वाचवने गरजेचे आहे.आसे मत आर्चनाताई पाटील यांनी या कार्यक्रमा दरम्यान व्यक्त केले.आणि बालके कुपोषीत होणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आवाहन सुध्दा केले.यावेळी पाककला स्पधेंतील प्रथम विजेती सुशिला वराळे,द्वितीय विजेती आर्चना सोनवणे,त्रतिय विजेती सविता उटगे यांचा आर्चनाताई पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला डाँ.टीकोणे, पर्यवेक्षीका मनिषा पाटील,व्ही.व्ही.कुलकर्णी,एन.बी.गवळी,अंगणवाडी कार्यकर्त्या जोत्सना लोमटे,वरीष्ठ लिपिक आजय बंळवत यांच्या सह आंगणवाडी कार्यकर्त्या मदतनिस मोठ्या संख्येने उपस्थीत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सदस्या सुरेखा कदम होत्या तर कार्यक्रमाचे सुञसंचलन एस.एस.जगदाळे यानी केले.