डॉ.प्रतापसिंह पाटील खासदार होणार का?


आरएसएस च्या माध्यमातुन तिकीट मीळवण्याचे प्रयत्न:

श्रीराम क्षीरसागर 

लोकसभेच्या निवडनुका काही महीण्यावर येवून ठेपल्या आहेत सगळीकडच्या राजकीय वातावरणामध्ये आपनच श्रेष्ठ आसल्याच दाखवण्यासाठी स्पर्धा चालु झाल्या आहेत. त्याच प्रमाणे उस्मानाबाद जिल्हयामध्ये ही आनेक नविन उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरणार आसल्याचे चित्र दिसत आहे.त्यापैकीच डॉ.प्रतापसिंह पाटील हे एक चर्चेतलं नाव. पाटील यांनी उस्मानाबाद जिल्हयाचा खासदार होयचं म्हणुन सगळयांच्या आदिपासुनच तयारी चालु केली आहे. गेल्या काही दिवसापासुन पाटील यांनी आनेक सामाजीक, राजकीय आणि विविध प्रकारच्या कार्यक्रमाला हाजेरी लावुन लोकसभा मतदार संघामध्ये ठिकठिकानी आपल्या मित्रमंडळाची स्थापना केली आहे.परंतू डॉ.प्रताप सिंह पाटील यांच्यावर कुठल्याही राजकीय पक्षाचे लेबल लागले नाही.त्यामुळे पाटील यांना खासदार होण्यासाठी लोकांची किती पसंती आहे हे निदर्शनास आलेले नाही.उस्मानाबादच्या राजकारणात नविन चेहरा आशी पाटील यांची सध्यांतरी ओळख आ​हे.उस्मानाबाद जिल्हयाच्या ईथुन मागच्या खासदारांपैकी तर नवीन चेह—याला उस्मानाबाद करांनी खासदार होण्यासाठी पसंती दिलेली नाही.परंतू पाटील हे कोनत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार त्यावर जास्त आवलंबून आहे.डॉ.प्रतापसिंह पाटील यांच शिक्षण क्षेत्रात जरी वजन आणि नाव आसले तरी. राजकीय क्षेत्रात मात्र जनतेसाठी पाटील हे नवीनच आहेत.

डॉ.प्रतापसिंह पाटील यांना भाजपाचे लेबल लागन्याचे संकेत ?

डॉ.प्रतापसिंह पाटील यांचे नातेवाईक महाराष्ट्राच्या राजकारणात ठिकठिकणी सक्रीय आसल्याने पाटील यांनी भाजपा पक्षातुन तिकीट मिळवण्यासाठी तगडी फिल्डींग लावल्याची माहीती मीळत आहे.आगदी आरएसएस कडुन शिफारस करूण तिकीट मीळवण्याचे प्रयत्न सुध्दा चालु आसल्याची माहीती मीळत आहे.परंतू शिवसेना आणि भाजपाची युती जर झाली तर शंकर बोरकर, रवि गायकवाड,सुधीर पाटील,रोहन देशमुख आशा दिग्गज उमेदवारासह अपक्षांना तोंड देवुन डॉ.प्रतापसिंह पाटील यांना विरोधी पक्षाशी सामना करावा लागणार आहे. या सगळया परिस्थितीवर मात करूण उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील जनता डॉ.प्रतापसिंह पाटील यांना स्विकारणार का हा मोठा प्रश्न आहे.