गेवराई तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी शेतक—यांचे तहसिलदारंना निवेदन


शाम जाधव रिपोर्टर: 

गेवराई तालुक्यात गेली चार वर्षापासुन दुष्काळी परिस्थीती आसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आसुन आर्थिक नुकसानीत आहे.यामुळे हा तालुका दुष्कारग्रस्त जाहीर करून सरकारने  सरसकट कर्जमाफी दयावी या मागणीचे निवेदन धोंडराई गावातील शेतक—यांनी तहसिलदारांना दिदले आहे.

या वर्षी पाउस कमी आसल्याने खरिपाचे पिक पुर्णपणे वाया गेले आहे आणि रब्बीची खात्री नाही आशा सर्व परिस्थितीमुळे शेतकरी हातबल झाला आहे. तरी शासनाने या परिस्थीतीची गंभीर दख्खल घ्यावी आणि गेवराई तालुक्यात शेतक—यांचे लाईट बील माफ करावे तसेच बोंड आळी,हुमनी आळी याची नुकसान भरपाई तात्काळ दयावी त्याच बरोबर निर्माण झालेल्या पाणी टंचाईसाठी टॅंकरची सोय करावी आशा आनेक मागण्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. या निवेदनावरती अविनाश गायकवाड,नंंदु जाधव अभिजीत गिते,फयाज शेख,संदीप गलांडे,शाम जाधव आदीच्या सहया आहेत.