शंकर बोरकर उतरणार लोकसभा निवडुकीच्या रिंगणात:


बेकारांना काम मिळण्यासाठी नांमाकीत कंपण्याचे उदयोग येणार उस्मानाबद मध्ये 

श्रीराम क्षीरसागर 
1977 साली शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय वाटचाल सुरू करणारे शंकर बोरकर 2019 च्या लोकसभा आखाडयात उतरणार आसल्याची माहीती महाराष्ट्र लाईव्ह शी बोलताना बोरकर यांनी दिली.1985 ला उस्मानाबाद जिल्हयाचे संपर्क प्रमुख म्हणुन काम केलेले बोरकर 10 वर्ष उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे विरोधीपक्ष नेते होते.मुंबई येथे उदयोग साम्राज्य उभे करून आपल्या जिल्हयाशी सतत संपर्कात राहुन सुशिक्षीत बेकारासाठी काम करण्याची त्यांची सतत धडपड राहीलेली आहे. बोरकर यांनी 1999 साली डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात उस्मानाबाद मतदार संघातुन शिवसेच्या माध्यमातुन विधानसभेची निवडुक लढवली होती.परंतु त्यावेळी त्यांना आपयशाचा सामना करावा लागला होता.भुम,परंडा,वाशी मतदार संघातील लोकांना रोजगार मीळावा म्हणुन नृरसिंह सहकारी साखर कारखाण्याची निर्मीती बोरकर यांनी केली.काही दिवस कारखाना सुरळीत चालल्यावर त्याला राजकीय गृहण लागले आणि कारखाना बंद करावा लागला परंतु 2018 मध्ये लवकरच    कारखाना चालु करूण पुन्हा लोकांना रोजगार उपलब्ध करूण  शेतक—यांचे प्रश्न सोडवणार आसल्याचे ही शंकर बोरकर यांनी सांगीतले.2009 साली भुम,परंडा,वाशी मतदार संघातुन आमदार राहुल मोटे यांच्या विरोधात बोरकर यांनी विधान सभेची निवडनुक लढवली होती.त्यावेळी थेडया मतानी त्यांना पराभव स्विकारावा लागला होता.आशा प्रकारे राजकारण आणि उदयोंग दोन्ही क्षेत्रातील आनुभव आसलेले शंकर बोरकर 2019 च्या लोकसभा निवडनुकहीत सर्व ताकतीनिशी उतरणार आसल्याचे निश्चीत झाले आहे.
उस्मानाबाद जिल्हा मागास प्रवर्गामध्ये आसल्यामुळे जिल्हयामध्ये सुशिक्षीत बेकारांची संख्या मोठया प्रमाणात आहे.या लोकांना काम मिळावे म्हणुन उस्मानाबाद मधील भुम,परंडा,वाशी तसेच उस्मानबाद या तालुक्यामध्ये जागतीक दर्जाच्या नामांकीत कंपण्याचे काही उदयोग लवकरच जिल्हयात आनणार आसल्याची माहीती बोरकर यांनी महाराष्ट्र लाईव्ह शी बोलताना दिली.