
रिपोर्टर: करजखेडा येथे शासनाच्या कुठल्याही परवानगी शिवाय व कसलाही महसुल कर न भरता अवैध मुरूम उपसा करणा—या तिन टिप्परवर महसुल विभागाच्या अधिका—यांनी कारवाई केली आसुन वहातुक करणारे तिन टिप्पर ताब्यात घेतले आहेत.
उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा येथे गौन खनिजाचे अवैध रित्या खनन होत आसल्याची माहीती उस्मानाबाद महसुल विभागातील अधिका—यांना मिळाल्यावर या अधिका—यांनी ताबडतोप या ठीकानी जावुन कारवई करून मिंडकोन कंपनीचे एम,पी,29 एच,1758, एम,पी,29,एच,2189,टिएस,07,यूए,2610 हे तिन टिप्पर ताब्यात घेतले आहेत.सदरील कारवाई मडळ अधिकारी टोने तलाठी गोरे, तलाठी अमोल निरफळ , पडवळ , हराळकर , पाटील , यांनी यांच्याकडुन करण्यात आली आहे.